नगरच्या सन्मिता शिंदे यांची अंतिम फेरीसाठी निवड..! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, May 30, 2021

नगरच्या सन्मिता शिंदे यांची अंतिम फेरीसाठी निवड..!

 नगरच्या सन्मिता शिंदे यांची अंतिम फेरीसाठी निवड..!

सन्मिता यांची निवड नगरसाठी अभिमानाची गोष्ट...

सन्मिता शिंदे या व्याख्याते गणेश शिंदे यांच्या पत्नी..



नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

सध्या चालू असलेल्या कलर्स मराठी वाहिनी वर सुरू असणाऱ्या सुर नवा ध्यास नवा या गायन स्पर्धेत नगरच्या सन्मिता शिंदे यांची आता अंतिम फेरीत निवड झाली आहे. या गायन स्पर्धेत सहभागी झालेल्या हजारो गायकांमधुन सन्मिता शिंदे यांची या कार्यक्रमासाठी निवड झाली.निवड झालेल्या १६ स्पर्धकामधून अंतिम फेरीसाठी केवळ ६स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली. सन्मिता शिंदे यांनी गझल, अभंग, लावणी असे विविध गायन प्रकार गात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. सन्मिता  यांनी गायलेल्या बोलावा विठ्ठल, शुक्राची चांदणी, उंच उंच झुला, रूनुझुनू रूनुझुनु रे भ्रमरा, या विविध गीतांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. विविध प्रकारात गीते गाणारी स्पर्धक म्हणून सन्मिता यांनी आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. आपण गायलेल्या लावणीत पावित्र्य जाणवले असे म्हणत परीक्षक महेश काळे यांनी सन्मिता यांनी गायलेल्या लावणीचे कौतुक केले.

सन्मिता यांची निवड नगर साठी अभिमानाची गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया नगर मधील अनेक राजकीय सामाजिक  क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली. या स्पर्धेत पुढील विजय हा श्रोत्यांच्या मतदानावर अवलंबून असणार आहे. त्या साठी नगरचा अभिमान म्हणून अनेक राजकीय सामाजिक संघटना त्या साठी प्रयत्न करताना दिसत आहेत. सन्मिता शिंदे या व्याख्याते गणेश शिंदे यांच्या पत्नी आहेत. नगर तालुक्यातील पारगाव हे त्यांचे मूळ गाव आहे. पारगाव,अहमदनगर शहर,नगर जिल्हा,तसेच जिल्ह्या बाहेरील ही अनेक युवक युवती सन्मिता यांच्या प्रचारासाठी प्रयत्न करत आहेत. गणेश शिंदे हे व्याख्याते म्हणून सर्वांना परिचित आहेत. तसेच झी मराठी वाहिनीवरील मोगरा फुलला या ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित कार्यक्रमातून ही जोडी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. वारकरी संप्रदायातील अनेक महाराजांपासून तर राज्यभरातील अनेक राजकीय नेत्यांनी, सन्मिता यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment