फलक लेखनाच्या माध्यमातून कोरोनाविषयी जनजाग्रृती - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 24, 2021

फलक लेखनाच्या माध्यमातून कोरोनाविषयी जनजाग्रृती

 फलक लेखनाच्या माध्यमातून कोरोनाविषयी जनजाग्रृती 



नगर दवंडी 

 खरवंडी कासार 

कोरोनाच्या या कठीण कालखंडामध्ये  अनेक राजकीय, सामाजिक, व धार्मिक लोक कोरोना बाबत जनजागृती करत आहेत, मुंगुसवाडे येथील श्रावण भारती बाबा प्रशाला , या माध्यमिक शाळेचे राज्य पुरस्कार प्राप्त कला शिक्षक श्री.किसन जगताप हेही कोरोनाविषयीच्या जनजागृती मोहिमेत  आपले योगदान देताना दिसत आहेत.उत्तम फलकलेखनाचा छंद असलेले श्री.जगताप नेहमीच महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या, सण-उत्सव, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घटना  आपल्या सुंदर कलाकृतीच्या माध्यमातून फलकावर उतरवून आपल्या परीने जनजागृतीचा प्रयत्न करत असतात.कोरोना काळात पाळावयाच्या नियमांचे सुंदर असे प्रासंगिक फलक लेखन त्यांनी आजही करून समाजात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.यामध्ये मास्क, सॅनिटायझर चा वापर, सामाजिक अंतराचे पालन, लसीकरणाची गरज अशा वेगवेगळ्या पैलूंना त्यांनी हात घातला आहे. त्यांच्या या कलाकृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment