शहरात दुकानातून चोरी चोरी छुपके छुपके माल विक्री, पालिकेने केली मोठी कारवाई - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, May 12, 2021

शहरात दुकानातून चोरी चोरी छुपके छुपके माल विक्री, पालिकेने केली मोठी कारवाई

 शहरात दुकानातून चोरी चोरी छुपके छुपके माल विक्री, पालिकेने केली मोठी कारवाईनगरी दवंडी

नगर : महापालिकेने कठोर निर्बंधांची मुदत १५ मे पर्यंत वाढविली असून, नियमांचे पालन न करणाऱ्या माळीवाडा येथील दुकानदारांवर भरारी पथकाने बुधवारी कारवाई केली. त्यामुळे दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेने कडक पावले उचलली आहेत. कठोर निर्बंधांची मुदत पुढील पाच दिवस वाढविण्यात आली आहे. असे असताना नगर शहरातील माळीवाडा, सावेडी, तोफखाना आणि गंजबाजार आदी भागांतील दुकानदारांनी दुकाने उघडली व किराणा मालाची विक्री सुरूच ठेवली होती. दुकाने सुरू असल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या भरारी पथकाने विविध ठिकाणी कारवाई करीत १७ हजारांचा दंड वसूल केला. दुकानांचे शटर बंद करून विक्री करण्याचे प्रकार सुरूच असून, पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे. नियमांचे पालन न केल्याने संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here