आमदार लंके यांचे काम राज्यासाठी नव्हे तर देशासाठी आदर्शवत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे गौरवोदगार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, May 28, 2021

आमदार लंके यांचे काम राज्यासाठी नव्हे तर देशासाठी आदर्शवत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे गौरवोदगार

 आमदार लंके यांचे काम राज्यासाठी नव्हे तर देशासाठी आदर्शवत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे गौरवोदगार

आमदार लंके यांना १०५ वर्षांचे दिर्घायुष्य लाभावे; हजारे यांच्या शुभेच्छाानगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी 

मानवसेवा हीच माधवसेवा आहे या भावनेतून कोरोना संकटकाळात आमदार नीलेश लंके करीत असलेले काम केवळ राज्यासाठी नव्हे तर देशासाठी आदर्शवत, दिशादर्शक असल्याचे गौरवोदगार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काढले.तळागाळातील दिनदुबळ्यांची सेवा करण्यासाठी आमदार लंके यांना १०५ वर्षे दिर्घायुष्य लाभावे अश्या भावनीक शुभेच्छा हजारे यांनी दिल्या.

           ज्येष्ठ समाजसेवक हजारे यांनी राळेगण सिद्धी येथून भ्रमणध्वनीद्वारे भाळवणी येथील शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरातील (कोविड उपचार केंद्र) रुग्णांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.

             हजारे म्हणाले की,देशात अनेक आमदार आहेत मात्र आमदार लंके यांच्यासारख्या सर्वसामान्यांच्या सेवेसाठी २४ तास वाहून घेणारा लोकप्रतिधी विरळाच.कोरोना संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून आमदार लंके यांचे काम अव्याहतपणे सुरू आहे.या कामाची माहिती, आमदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या उपचार केंद्रात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे अनुभव, त्यांच्या भावना विविध समाजमाध्यमातून, वृत्तपत्रातून ऐकायला, वाचायला मिळतात. भाळवणी येथील उपचार केंद्रात दाखल झालेला रुग्ण तेथील आनंदी वातावरणाचा अनुभव घेतल्यावर आपण आजारी आहोत,आपणास कोरोना संसर्गाची बाधा झाली असल्याचे विसरून जातो.

           संपूर्ण जगात करोना संसर्गाची दहशत असताना कोरोना उपचार केंद्रातील आनंदी वातावरणामुळे रुग्ण बरा होण्यास मोठा हातभार लागतो किंबहुना तेथील वातावरणामुळे रुग्ण अपेक्षेपेक्षा कमी वेळेत बरा होतो.सध्याच्या वातावरणात आमदार लंके यांचे रुग्णसेवेचे काम मोठे असल्याचे हजारे म्हणाले.

            आमदार लंके ज्यावेळी आमदार नव्हते त्यावेळीही जनसामान्यांसाठी ते अहोरात्र झटत असत हे आपण अनुभवले आहे.आमदार लंकेे कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता करीत असलेल्या निष्काम सेवेमुळे त्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये असलेला आदर दिवसेंदिवस द्विगुणीत होत असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक हजारे म्हणाले.


शरीर हे जनसेवेचे साधन,शरीराची काळजी घ्या

 आमदार नीलेश लंके यांनी अहोरात्र जनसेवेसाठी वाहून घेतले आहे.आणि शरीर हेच जनसेवेचे साधन आहे.त्यामुळे आमदार लंके यांनी जपल पाहिजे.काळजी घ्यायला हवी असा वडिलकीचा सल्ला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आमदार लंकेे यांना दिला.त्याचबरोबर उत्तम दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here