पारनेर तालुक्याला वरदान ठरणारा जैवइंधन व सेंद्रिय खत प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, May 15, 2021

पारनेर तालुक्याला वरदान ठरणारा जैवइंधन व सेंद्रिय खत प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न

 पारनेर तालुक्याला वरदान ठरणारा जैवइंधन व सेंद्रिय खत प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्ननगरी दवंडी

निघोज - शुक्रवार दिनांक १४ मे २०२१ रोजी अक्षय तृतीया व रमजान ईद च्या शुभमुहूर्तावर पारनेर तालुक्याला वरदान ठरणारा एमसीएल अंतर्गत मळगंगा क्लिन फ्युअल प्रायव्हेट लिमिटेड,पारनेर या जगातील सर्वात मोठ्या बायो सीएनजी व सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन सोहळा पारनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार लोकनेते *निलेशजी लंके* यांच्या शुभहस्ते निघोज पिंपरी रोड  पठारवाडी येथे संपन्न झाला .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी *डॉक्टर सहदेव आहेर सर*

प्राचार्य श्री मुलिका देवी महाविद्यालय, निघोज हे होते . पारनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासामध्ये भर घालणारा व शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा हा प्रकल्प असुन शेती मधून तयार होणाऱ्या हत्ती गवत (गिन्नी गवत) व बायोमास यापासून सीएनजी व सेंद्रिय खत निर्माण होणार आहे. कंपनी सदर गवत शेतकऱ्यांकडून हमीभावाने खरेदी करणार असून त्यापासून तालुक्यातील शेतकऱ्यांना एकरी दोन ते अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळणार आहे .सदर प्रकल्प हा देशाचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम साहेब त्यांच्या प्रेरणेतून डॉक्टर शाम घोलप सर ,डॉक्टर लवेश जाधव सर, प्राची ढोले मॅडम तसेच मंगेश शेलार साहेब व पूर्ण एमसीएल परिवाराच्या प्रयत्नातून साकारत आहे .निर्माण होणाऱ्या इंधनापासून आपल्या गावापासून ते संपूर्ण देशाच्या विकासामध्ये भर पडणार आहे .आपल्या देशाचे वार्षिक सात लाख कोटी रुपये परकीय इंधन आयात करण्यामध्ये खर्च होत आहे .हा सर्व पैसा देशांच्या शेतकऱ्यांना मिळावा व त्याच्या माध्यमातून देश इंधनामध्ये स्वयंपूर्ण व्हावा असे कलाम साहेबांचे स्वप्न होते .हे स्वप्न पुर्ण करण्याचे काम एमसील परिवाराच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये करण्यात येत आहे .

       या प्रकल्पाच्या माध्यमातून देशातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये हा प्रकल्प उभा करण्याचे  एमसीएल परिवाराचे ध्येय आहे .या माध्यमातून प्रत्येक तालुक्यामध्ये शेतमजूरा पासून ते कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत साडेतीन ते चार हजार रोजगार तालुक्यात निर्माण होणार आहेत.तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये ग्राम उद्योजक तयार होणार आहे.

      याप्रसंगी बोलताना तालुक्याचे आमदारसाहेब म्हणाले की खऱ्या अर्थाने आज पारनेर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या सामान्य जनतेच्या मालकीचा प्रकल्प माता मळगंगा ऍग्रो प्रोडूसर कंपनी ,पारनेर च्या माध्यमातून उभा राहत आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. आतापर्यंत उद्योगजकाचाच मुलगा उद्योजक, कारखानदाराचा मुलगा कारखानदार, आमदाराचा मुलगा आमदार या पारंपारिक चालीला 

छेद देऊन खऱ्या अर्थाने तालुक्याच्या विकासामध्ये भर घालण्याचा नवीन पायंडा या प्रकल्पाच्या माध्यमातून होत आहे. तरी या प्रकल्पासाठी मी स्वतः या कंपनीचा भागधारक झालो असून तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी ही  भागधारक व्हावे असे आवाहन त्यांनी केले व यापुढे या प्रकल्पासाठी लागणारे सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी डॉ. आहेर सरांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

     यावेळी डॉक्टर सहदेव आहेर सर, तालुका कृषी अधिकारी जयंत साळवे साहेब, डॉक्टर भास्करराव शिरोळे, एम सी एल चे बी.डी.ए. श्री राहुल मांडे सर, अमित ढोले सर, पठारवाडी गावचे उपसरपंच मारुती पठारे, निघोजचे उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे, पिंपरी जलसेनचे उपसरपंच भाऊसाहेब पानमंद, बाभुळवाडे गावचे सरपंच देवेंद्र जगदाळे, निघोज ग्रामपंचायत सदस्य योगेशशेठ वाव्हळ, रामदास शेठ गाडीलकर, उद्योजक राजुशेठ लाळगे, विष्णू लोखंडे साहेब, बाळासाहेब लंके, मंगेश लंके, ठकाराम शेठ झंजाड, गोरक्ष कोल्हे, काळूरामशेठ बाबर, संतोष खणकर, राजू जगदाळे, कांचनशेठ रसाळ, राहुल शेळके, विशाल लाळगे,यशराज गायकवाड व कंपनीचे अध्यक्ष श्री सुरेशशेठ ढवण, उपाध्यक्ष रामदासशेठ लंके, संचालक रामदासशेठ रसाळ, अशोकराव मेसे, रायचंदशेठ गुंड, प्रकाशदादा थोरवे, संदीप ढवळे, संचालिका रंजनाताई ढवण, निर्मलाताई थोरवे, शोभाताई टिकेकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कंपनीचे संचालक सोमनाथशेठ वरखडे यांनी केले व उपस्थितांचे आभार कंपनीचे कार्यकारी संचालक दिलीपशेठ ढवण  यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here