इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आकिर्टेक्ट व पीस फौंडेशनच्या वतीने रक्तदान शिबीराला उस्फुर्त प्रतिसाद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 15, 2021

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आकिर्टेक्ट व पीस फौंडेशनच्या वतीने रक्तदान शिबीराला उस्फुर्त प्रतिसाद

 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आकिर्टेक्ट व पीस फौंडेशनच्या वतीने रक्तदान शिबीराला उस्फुर्त प्रतिसाद



नगरी दवंडी

नगर प्रतिनिधी

रक्तदान हे पवित्र दान समजले जाते.सामाजिक बांधिलकीतून आम्ही  खारीचा  वाटा उचलण्याचा प्रयत्न करत आहोत.सामाजिक जाणिवेतून ज्या समाजात आपण राहतो   सामान्यांचे जीव वाचवण्यासाठी आम्ही हे करत आहोत. असे प्रतिपादन  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आकिर्टेक्ट सेंटर अहमदनगर व पीस फौंडेशनचे अध्यक्ष अर्शद शेख यांनी केले.

 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आकिर्टेक्ट सेंटर अहमदनगर व पीस फौंडेशनच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी सेंटर व पीस फौंडेशन चेअध्यक्ष अर्शद शेख, उपाध्यक्ष प्रल्हाद जोशी, सचिव संतोष गायकवाड,तेजस दारोकर, आदीत्य आडेप, प्रविण आरू,कमलेश रोहिडा,उदय काकडे,मुनज्जर शेख, उपाध्यक्ष सय्यद अन्सार, शेख अजोमोदिन,हाफीज अबरार, शेख जफर,गनीभाई तांबोळी,मलिकार्जुन सर आदी मान्यवर उपस्थित होते.

शेख पुढे म्हणाले की,कोरोनाच्या काळात रक्ताची टंचाई भासत आहे.त्याकरीता आमच्या संस्थेच्या माध्यमातून आमचे सर्व सदस्य व कुटुंबातील व्यक्ती यात सहभाग घेऊन रक्तदान केले.प्रल्हाद जोशी म्हणाले कोंरोनाचे मोठे संकटामुळे रक्ताचा तुटवडा वाढला आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी रक्त दान करावे

शिबिर यशस्वी होण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आकिर्टेक्ट सेंटर अहमदनगर व पीस फौंडेशनचे सर्व सदस्य व अर्पण ब्लडबॅकेने परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment