निंबळक येथे लसीकरणाचे डोस वाढवावे ः लामखडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, May 19, 2021

निंबळक येथे लसीकरणाचे डोस वाढवावे ः लामखडे

 निंबळक येथे लसीकरणाचे डोस वाढवावे ः लामखडे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः लोकसंख्येच्या प्रमाणानुसार निंबळक येथे अतिशय कमी प्रमाणात लसीकरण झाले आहे.  येथील लसीकरणाचे डोस वाढविण्यात यावे या बाबतचे निवेदन अजय लामखडे व उपसरपंच बाळासाहेब कोतकर  यांनी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्याकडे दिले .
निबळक (ता. नगर) येथील लोकसंख्या पंधरा हजारच्या आसपास आहे. लसीकरण चालू झाल्यापासून निंबळक गावाला अवधे तिनशे पन्नास डोस मिळाले आहे. येथे कोरोना रूग्णाची संख्या मोठया प्रमाणात आहे. कोरोनामुळे  पंचवीस ते तीस नागरिकना जीव गमवावा लागला आहे. गावाजवळ असणार्‍या एमआयडीसी मध्ये येथील नागरिक कामाला जात आहे बहुतेक एमआयडीसी येथील कामगार भाडेतत्वावर राहत आहेत. तसेच  बाहेर गावामधन एमआयडिसी येथे येणार्‍या कामगार वर्गाची संख्या जास्त असल्यामुळे एकमेंकाबरोबर संपर्क येत आहे. यामुळे कोरोनाचा फैलाव मोठया प्रमाणात होत आहे. यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यास जास्तीत जास्त नागरिक लस देणे अत्यंत गरजेचे आहे. तरी  जास्त लसीकरण होण्यास संबंधित कार्यालय यांना निर्देश देण्यात  यावे.
84 दिवस पुर्ण झालेल्या नागरिकाना दुसरा डोस दिला जाणार आहे . यामुळे लस आल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राने केलेल्या नियोजनानुसार गावनिहाय पुन्हा पहिला डोस दिले जाणार असल्याचे प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी सांगीतले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here