हमाल वर्गाच्या कामाप्रती आदर हेच कामगार दिनाचे खरे सार्थक - अभय आव्हाड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, May 7, 2021

हमाल वर्गाच्या कामाप्रती आदर हेच कामगार दिनाचे खरे सार्थक - अभय आव्हाड

 हमाल वर्गाच्या कामाप्रती आदर हेच कामगार दिनाचे खरे सार्थक - अभय आव्हाड

 


नगरी दवंडी

खरवंडी कासार प्रतिनिधी -

आजच्या समाजव्यवस्थेत हमाली काम करून काबाडकष्ट करणारा वर्ग नेहमीच उपेक्षित राहिला असून रोज हमाली काम केल्याशिवाय या वर्गाची चूल पेटत नाही. सध्याची परिस्थिती अतिशय विदारक असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची कोणीही अपेक्षा केली नव्हती. कोरोनाच्या या भयावह परिस्थितीतही हमाल वर्गास काम केल्याशिवाय गत्यंतर नसून सध्या लॉकडाऊन असल्यामुळे त्यांचा आर्थिक डोलारा कोलमडून गेला आहे. अशा वेळी त्यांच्या कामाप्रती आदरभाव व्यक्त करणे हेच आजच्या कामगार दिनाचे खरे सार्थक ठरेल असे प्रतिपादन पाथर्डी नगरपरिषदेचे मा. नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी केले. आज पार्थ विद्या प्रसारक मंडळाच्या प्रांगणात शहरातील 25 हमालांचा सत्कार अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठान मार्फत किराणा व जीवनावश्यक वस्तू देऊन करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. 

तसेच यावेळी शहरातील कोरोनाग्रस्त व्यक्तींची अंत्यविधी प्रक्रिया पार पडणारे स्वर्गरथ चे चालक व नगरपरिषदेचे कर्मचारी बाळू दिनकर, खंडू दिनकर, अमोल पठारे, लक्ष्मण दिनकर, लखन दिनकर, हरी भालेराव तसेच आरोग्य निरीक्षक दत्ता ढवळे व सुपर वायझर शिवाजी पवार यांचा विशेष सन्मान जीवनावश्यक वस्तू व आर्थिक मदत देऊन प्रतिष्ठान मार्फत करण्यात आला. कोरोनामुळे मृत्यूनंतरही होत असलेली हेळसांड आपण पाहतो. जवळच्या नातेवाईकांकडूनही  दुर्लक्षित होत असलेला  अंत्यविधी कार्यक्रम आपुलकीने पार पडणारे हे सुद्धा खरे कोरोना योद्धे असून त्यांच्या रात्रंदिवस चालणाऱ्या कामाची दखलही आजच्या कामगार दिनी घेणे हे आपले कर्तव्यच आहे म्हणून त्यांच्याही कामाला अभय आव्हाड प्रतिष्ठानचा सलाम आहे. त्यांच्या सुखदुःखात प्रतिष्ठान नेहमीच सहभागी राहील असे अभय आव्हाड यांनी शेवटी म्हटले. 

या सन्मानप्रसंगी दत्ता सोनटक्के, बबन सबलस, गणेश टेके, पप्पू नरवणे, मल्हारी शिरसाट, आजिनाथ मोरे, संदीप काकडे, भय्या नांगरे, संदीप बालवे, मनोज ढाकणे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment