आ. संग्राम जगताप यांनी घेतली आरोग्यमंत्री टोपेंची भेट. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 29, 2021

आ. संग्राम जगताप यांनी घेतली आरोग्यमंत्री टोपेंची भेट.

 आ. संग्राम जगताप यांनी घेतली आरोग्यमंत्री टोपेंची भेट.

शहरातील नागरिकांची लसीकरण प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक लसीचा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी.नगरी दवंडी

अहमदनगर- महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री श्री.राजेश जी टोपे यांची भेट घेऊन अहमदनगर शहरातील सर्व नागरिकांची लसीकरण प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याच्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या लसींची साठा उपलब्ध करून देण्याची आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी मागणी केली.

याप्रसंगी आरोग्यमंत्री श्री.राजेश जी टोपे यांनी नगर शहरासाठी आवश्यक प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आमदार संग्रामभैय्या यांना दिले. 

या भेटीप्रसंगी आरोग्यमंत्री श्री.राजेश जी टोपे यांना आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी नगर शहरात कोरोना महामारीच्या अनुषंगाने प्रशासन व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आपण करत असलेल्या उपाययोजना बाबत सविस्तर माहिती दिली. तसेच लहान मुलांसाठी धोक्याची असलेल्या भविष्यातील तिसऱ्या लाटेसाठी शहरातील बालरोगतज्ज्ञ समितीच्या माध्यमातून करत असलेल्या उपाययोजनांची त्यांना माहिती दिली.

याप्रसंगी आमदार संग्रामभैय्या जगताप, मनपा स्थायी समिती सभापती श्री अविनाश घुले, जेष्ठ नगरसेवक श्री गणेश भोसले, नगरसेवक श्री विनीत पाऊलबुधे, माजी नगरसेवक श्री संजय चोपडा आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment