केडगाव येथील भाग्योदय मंगल कार्यालय येथे लसीकरण केंद्र सुरू - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 31, 2021

केडगाव येथील भाग्योदय मंगल कार्यालय येथे लसीकरण केंद्र सुरू

 केडगाव येथील भाग्योदय मंगल कार्यालय येथे लसीकरण केंद्र सुरू

अहमदनगर - केडगाव येथील आरोग्य केंद्र हे फक्त एकच लसीकरण केंद्र असल्याने या ठिकाणी केडगाव भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण होती त्यावर नियंत्रण ठेवून गर्दी कमी करण्यासाठी विश्वेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश सातपुते यांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे लसीकरण केंद्र सुरू व्हावे यासाठी मागणी केली होती. या मागणीला यश आले असून या लसीकरण केंद्राचे उद्घाटन माजी नगरसेवक सुनील मामा कोतकर यांच्या हस्ते झाले तसेच ज्येष्ठ नागरिकांना लस देऊन लसीकरण चालू करण्यात आले यावेळी मा. नगरसेवक सुनीलमामा कोतकर समवेत ,विश्वेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश सातपुते, सागर सातपुते, बापु सातपुते, भूषण गुंड, योगेश कुमठेकर,राष्ट्रवादी विद्यार्थीचे उपाध्यक्ष विशाल सकट,  विशाल सकट, अविनाश औटी, ऋषिकेश नेटके, दीपक आगरकर, मयूर जगदाळे, सोनू धेबुड, सुरेश चौधरी आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  
मा नगरसेवक सुनील कोतकर म्हणाले की केडगाव येथील लसीकरण केंद्रापासून लांब असलेले भाग मराठा नगर, एकनाथ नगर, वैष्णव नगर, उदयनराजे नगर, शिवाजीनगर या भागातील नागरिकांना लसीकरण केंद्र लांब पडत असून येथील नागरिकांना लसीकरण जवळ उपलब्ध करण्यासाठी भाग्योदय मंगल कार्यालय येथे लसीकरण केंद्र चालू करण्यात आले असून परिसरातील नागरिकांनी लस घेण्याचे आव्हान कोतकर यांनी केले. विश्वेश्वर प्रतिष्ठान चे अध्यक्ष गणेश सातपुते यांच्या प्रयत्नातून केडगाव येथील भाग्योदय मंगल कार्यालय येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले यावेळी मा.नगरसेवक सुनीलमामा कोतकर, माजी सभापती मनोज कोतकर,सागर सातपुते, बापु सातपुते, भूषण गुंड, योगेश कुमठेकर, राष्ट्रवादी विद्यार्थीचे उपाध्यक्ष विशाल सकट, अविनाश औटी, ऋषिकेश नेटके, दीपक आगरकर, मयूर जगदाळे, सोनू धेबुड, सुरेश चौधरी आदींसह नागरिक उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment