सामाजिक कार्यकर्त्याला केली मारहान! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 31, 2021

सामाजिक कार्यकर्त्याला केली मारहान!

 सामाजिक कार्यकर्त्याला केली मारहान!

गावच्या स्मशानभूमीसाठी जागा दिल्यावरून वाद.

नेवासा - गावाला स्मशानभूमीसाठी जमिन नसल्यामुळे  स्वता:ची 10 गुंठे जागा देणार्‍या नागनाथ नच्छिंद्र आगळे या सामाजिक कार्यकर्त्याला गावातील संभाजी शिवाजी आगळे याच्यासह अन्य सात जणांनी तु कसा काय जागा देतो, तुला याच स्मशानभूमीत जाळून टाकतो असा दम भरत या सामाजिक कार्यकर्त्यासह त्याच्या पत्नी व दोन मुलांना गंभीर मारहाण करुन जखमी केलेची घटना नेवासा तालूक्यातील खामगांव नं.3 येथे घडली आहे या मारहाणीत जखमी झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यावर नेवासा फाटा येथील नजन हॉस्पिटल येथे औषधोपचार सुरु असून या प्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे तर पाच जण फरार झाले आहेत.
याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की,खामगांव नं.3 गावाला स्मशानभूमी नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण झालेली होती गावाची समस्या सोडविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते नागनाथ मच्छिंद्र आगळे यांनी त्यांची गावात 10 - 15 वर्षापासून पडीक असलेली जमिनी मधील 10 गुंठे जागा स्मशीनभूमीला देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करुन पुढाकार घेतला व त्या जमिनीतील वेड्या बाभळी काढून स्मशानभूमीसाठी जागा व्यवस्थित करीत असतांना शेतीच्या बांधावरुन वाद होवून तु कसा काय?स्मशानभूमीला जागा देतो,तुला याच स्मशानभूमीत जाळून टाकतो? असा दम भरत नागनाथ आगळे व त्यांच्या पत्नी रंजना यांच्यासह भाऊसाहेब व विजय या दोन मुलांना जब्बर मारहाण करीत जखमी केल्याची घटना खामगांव येथे घडली या प्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सुभाष संभाजी आगळे व महेश शंकर आगळे या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे तर संभाजी शिवाजी आगळे,पांडूरंग संभाजी आगळे,ज्ञानेश्वर संभाजी आगळे,मंदाबाई संभाजी आगळे,प्रकाष शंकर आगळे फरार झाले असून पोलिस या आरोपींचा शोध घेत आहेत.

No comments:

Post a Comment