ग्रामीण रुग्णालयातील कोविड रुग्णांना अंडी, केळी,खजूरसह पाणी बाटल्यांचे वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, May 31, 2021

ग्रामीण रुग्णालयातील कोविड रुग्णांना अंडी, केळी,खजूरसह पाणी बाटल्यांचे वाटप

 ग्रामीण रुग्णालयातील कोविड रुग्णांना अंडी, केळी,खजूरसह पाणी बाटल्यांचे वाटप

डॉक्टर व आरोग्य कर्मचार्‍यांचा ही गौरव


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः नेवासाफाटा येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटर मधील रुग्णांना उकडलेली अंडी केळी खजूरसह पाणी बॉटलचे वाटप करून व डॉक्टर आरोग्य कर्मचार्‍यांचा सत्काराद्वारे गौरव करून शिक्षिका मिनाक्षी अवचरे यांनी आपला वाढदिवस साजरा केला.
कोरोनाच्या महामारीमुळे सर्वांवर मोठे संकट उभे राहिले असतांना यातच अनेक मदतीचे हात खारीचा वाटा उचलण्यासाठी पुढे येत आहे.असाच खारीचा वाटा देण्यासाठी जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका श्रीमती मिनाक्षी अवचरे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून नेवासाफाटा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णांना पोषक आहाराच्या रूपाने उकडलेली अंडी केळी पाणी बॉटल,खजूर, पाणी बॉटलचे वाटप केले.
सदर आहाराचे ट्रे ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मोहसीन बागवान यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.यावेळी फादर प्रकाश राऊत यांनी सर्वच कोरोनाचे रुग्ण बरे व्हावेत तसेच रुग्णांची अहोरात्र सेवा करणार्‍या डॉक्टर व नर्सेस या आरोग्य कर्मचार्‍यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी प्रार्थना केली.
यावेळी फादर प्रकाश राऊत व शिक्षिका मिनाक्षी अवचरे,जेष्ठ पत्रकार सुधीर चव्हाण,राजेंद्र वाघमारे, यांच्या हस्ते कोरोनाच्या संकटकाळी देवदूताप्रमाणे रुग्णांची अहोरात्र सेवा देणार्‍या डॉक्टर नर्सेस व आरोग्य कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आला तर ग्रामीण रुग्णालयाला ऑक्सिजन लाईन दिल्याबदल फादर प्रकाश राऊत यांचा पुष्पगुच्छ देऊन डॉ.मोहसीन बागवान यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.शाहिद,डॉ.संध्या जोशी,सामाजिक कार्यकर्ते रामदास अवचरे,सौ.अवचरे, नितीन निपुंगे,इंचार्ज शीलाताई सुखदान,आरोग्य सेविका शीतल क्षीरसागर,सुनीता गरड, श्रीमती विद्या पाठक, श्रीमती शिंदे,श्रीमती थोरात,श्रीमती नवगिरे, श्रीमती वालटे,श्रीमती एडके,श्रीमती पंडित,प्रशासकीय कर्मचारी दरंदले,श्री.चौधरी,औषधी निर्माता बोपीनवार,श्रीमती गावंडे उपस्थित होते.पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर जेष्ठ पत्रकार राजेंद्र वाघमारे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here