लसीकरणावरुन राष्ट्रवादी कॉग्रेस व कॉग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप.... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 29, 2021

लसीकरणावरुन राष्ट्रवादी कॉग्रेस व कॉग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप....

काँग्रेस स्टंटमॅनला मानसोपचाराची गरज ः खोसे.
आ. जगताप समर्थकांनी धुडगुस घातला ः काळे.

कॉग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळेंच्या आरोपांना आ.जगताप समर्थकांचे प्रतिउत्तर.

लसीकरणावरुन गदारोळ... आरोप-प्रत्यारोप.

नगर शहराच्या स्थापना दिनी जुन्या महानगरपालिकेतील मनपा आरोग्य अधिकार्यांच्या दालनामध्ये आमदार संग्राम जगताप समर्थकांनी धुडगूस घातला. जगताप आणि त्यांचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांना महापालिकेवर हल्ला करत तोडफोड करायची होती. त्यांनी खुर्च्यांची आदळा आदळ केली. बाटल्या फोडण्यासाठी उगारल्या. दहशत निर्माण केली. कोरोना काळात जमाव गोळा करून मनपावर हल्ला करण्याचा त्यांचा डाव होता. या घटनेतून नगर शहरात संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा एसपी ऑफिस हल्ला प्रकरणाची पुनरावृत्ती होते की काय अशी तणावपूर्ण परिस्थिती मनपात निर्माण झाली होती, असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत काल केला. जुन्या महानगरपालिकेमध्ये काल दुपारी तीनच्या सुमारास किरण काळे हे ब्लॉक कांग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी काँग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील यांच्यासह मनपा आरोग्य अधिकारी यांच्यासमवेत लसीकरणाच्या शहरातील सुरू असणार्‍या गोंधळाबाबत चर्चा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्या ठिकाणी आधीपासूनच आरोग्य अधिकार्यांच्या दालनामध्ये जगताप आपल्या कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने याठिकाणी एकत्रित केले होते. त्याआधीच नगरसेवक बाळासाहेब बोराटे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मनपात बाचाबाची झाल्याची चर्चा काल शहरात सुरू होती.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर महानगरपालिकेच्या जुन्या मनपा कार्यालयातील आरोग्य अधिकार्‍याच्या दालनामध्ये प्रत्यक्ष प्रात्यक्षिक किरण काळे यांच्या अभिनय कौशल्याच्या माध्यमातून स्टंट पाहिला मिळाला. सदरचा स्टंट हा नगरकरांसाठी काही नवीन नाही. पण या माध्यमातून त्यांच्या पक्षक्षेष्ठींना किरण काळे हे काय दाखवण्याचा प्रयत्न करतात, हे समजून येत नाही. किरण काळेंची मानसिक वृत्ती व राजकीय हेवा पाहता त्यांना मानसोपचार तज्ञांच्या सल्ल्याची गरज आहे. कारण राजकारणात संयम, विचार व लोकसेवेने प्रश्न मार्गी लागतात.त्यामुळे किरण काळेंच्या अशा विचित्र स्टंटला नगरकर भिक घालणार नाहीत असं मत आ. संग्राम भैया जगताप जगताप समर्थक राष्ट्रवादी शहराध्यक्ष अभिजित खोसे व सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुरेश बनसोडे सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी सचिव निलेश बांगरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.  काल स्वत: आमदार श्री.संग्राम जगताप हे निवडक पदाधिकार्‍यांसमवेत दुपारी 2 वाजता शहरातील लसीकरणाबाबत आरोग्य अधिकारी श्री.बोरगे यांच्या कडून माहिती घेवून लसीकरणाबाबत उपाययोजना करण्याबाबत व सर्व लसीकरण केंद्रांना लसींचे समान वाटप करण्याबाबत सूचित करत असताना किरण काळे हे निवडक त्यांच्या स्टंटमधील पात्रांना आरोग्य अधिकार्‍यांच्या दालनामध्ये प्रवेश घेवून आरडा- ओरडा करून लागले. त्यावेळी पोलीस प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी त्यांना याबाबत मज्जाव करून दालना बाहेर काढले व स्टंट करण्यापासून रोखले. पण किरण काळे यांनी पत्रकार परिषद घेवून नेहमीप्रमाणे पत्रकार व नगरकरांची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे असेही अभिजीत खोसे म्हणाले.
किरण काळे यांची मानसिक वृत्ती पाहता राजकारणामध्ये स्टंट करून मोठे व्हायचे असल्याचे दिसून येते. पण राजकारणात नागरिकांची सेवा व त्यांचे प्रश्न सोडवून मोठे होता येते, तेव्हाच नागरिक लोकप्रतिनिधी म्हणून स्विकारतात. कदाचित ही बाब त्यांना माहित नाही. तसेच काल आमदार महोदय व आरोग्य अधिकारी यांची बैठक सुरू असताना अनाधिकृतपणे दालनात प्रवेश करून काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाचा शहराध्यक्ष असून साधा प्रोटोकॉल माहित नाही का ? म्हणजेच त्यांचा स्टंट करण्याचा हेतू यातून स्पष्ट होतो. तसेच याबाबत मनपामध्ये बैठक सुरू असल्याचे काही ब्लॅकमेलर लोक जे त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी किरण काळेंना बोलवून घेतले असल्याचे निलेश बांगरे म्हणाले.
महापौरपदाच्या निवडणुकीत महापौरपद आपल्याच पक्षाकडे राहावं हे अपेक्षा व्यक्त करणार्‍या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या नेत्यांनी लसीकरणाच्या मुद्यावरून एकमेकांच्या विरोधात दंड थोपटल.े शहरातील नागरिकांना लस मिळत नसताना लसीच्या पळवापळवीच्या व्हिडिओ वरून तुंबळ वाद झाला. पोलीस प्रशासनाने धाव घेऊन वाद करणार्‍या नेत्यांना समजून सांगितल्याने नगरचा बिहार होऊ शकला नसला, तरी लसीकरणावरुण वाढत असलेला वाद संपविण्यासाठी मनपा प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे.
लसीकरण केंद्रावर लस मिळत नसल्याची तक्रार करण्यासाठी काल शिवसेना नगरसेवक बाळासाहेब बोराटे आरोग्य अधिकारी अनिल बोरगेंकडे जुन्या महानगरपालिकेत आले असता त्यांची आ. संग्राम जगतापांशी शाब्दिक चकमक झाली. बोराटे व जगतापांच्या वादाची माहिती काही क्षणातच आ.जगताप समर्थकांना समजताच जगताप समर्थकांनी जुन्या महापालिकेत गर्दी केली. मोठा गदारोळ उडाला असतानाच काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे ही शहरातील लसीकरणाच्या गोंधळाबाबत आरोग्य अधिकार्‍यांशी चर्चा करण्यासाठी आले. काळे व आ. जगताप यांच्यामध्ये अनेक दिवसांपासून संघर्ष सुरू असल्यामुळे आ. संग्राम जगताप समर्थकांच्या रागाला त्यांनाही सामोरे जावे लागले. यावेळी किरण काळे यांनी नगरचा बिहार झाला असल्याचे मत व्यक्त करून आ. संग्राम जगताप यांच्यावर अनेक आरोप केले. या आरोपांना आज पत्रकार परिषदेद्वारे प्रत्युत्तर देण्यात आले.

No comments:

Post a Comment