शहरात 69 कोरोना रुग्ण असताना निर्बंध का? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, May 29, 2021

शहरात 69 कोरोना रुग्ण असताना निर्बंध का?

 शहरात 69 कोरोना रुग्ण असताना निर्बंध का?

किराणा, भाजीपाला मिळेना!
आयुक्तांच्या निवासस्थानासमोर आक्रोश.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असताना मनपा आयुक्त किराणा, भाजीपाला, फळ विक्रीची परवानगी देण्यास टाळाटाळ करत आहेत. राज्यातील अनेक शहरात सकाळी 7 ते 11 या काळात दुकाने उघडण्यास परवानगी असताना मनपा आयुक्त आपल्या अधिकाराचा गैरवापर करून नगरकरांना छळत असल्याच्या निषेधार्थ शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करून घोषणाबाजी करत आक्रोश व्यक्त केला.

काल किराणा दुकान, फळ-भाजीपाला विक्रीवर निर्बंध उठविण्यात बाबत आयुक्त व उपायुक्त सोबत बैठकीत निर्बंध उठविण्याबाबत आश्वासन दिले असताना त्याबाबत आदेश न निघाल्याने माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते संजय झिंजे, शाकीर शेख, माजी नगरसेवक बहिरानाथ वाकळे यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.
किराणा दुकान, फळ व भाजीपाला विक्रीवर असलेल्या निर्बंध उठविण्याबाबत शुक्रवारी (दि.28 मे रोजी)  संध्याकाळी आयुक्त शंकर गोरे व उपायुक्त यशवंत डांगे यांच्यासह बैठक झाली. निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र संध्याकाळी बैठक होऊन देखील लेखी पत्र न मिळाल्याने सदरचे आंदोलन करण्यात आले. अत्यावश्यक वस्तूंवर घातलेले निर्बंध मागे घेण्यासाठी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. आयुक्तांशी चर्चा करुन आंदोलकांनी महापालिकेत जाऊन आस्थापना प्रमुख साबळे यांच्याकडून लेखी पत्र घेतले. या पत्रात दि.1 जूनच्या राज्य सरकारच्या निर्णयानूसार या प्रश्नी निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

महापालिकेच्या फतव्याचा गैरफायदा घेऊन अनेक किराणा दुकानदार मालाची चढ्या भावाने विक्री करुन काळाबाजार करीत आहे. आयुक्तांनी बैठक घेऊन शहरातील किराणा दुकान, फळ व भाजीपाला विक्रीवर असलेल्या निर्बंधाबाबत दि.28 मे रोजी निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांनी आश्वासन न पाळता नगरकरांची फसवणुक केली आहे. - शाकीर शेख, सामाजिक कार्यकर्ते

कोरोना रुग्ण, वृध्द, लहान व गरोदर महिलांना फळ, भाजीपाला व सुकामेवा या खाद्य पदार्थाची आवश्यकता असते. मात्र या सर्व गोष्टींवर निर्बंध घालण्यात आल्याने सर्वसामान्यांना हे खाद्य पदार्थ मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. एक महिना अत्यावश्यक वस्तूंवर सरसकट बंदीचा फतवा अन्यायकारक आहे. - संजय झिंजे, माजी नगरसेवक

शहरात दारु दुकानातून सर्रास विक्री होत असताना त्यांच्यावर कारवाई होत नाही. मात्र किराणा दुकानावर निर्बंध लादले जात आहे. इतर जिल्ह्यात किराणा, फळ, अंडी, मटन विक्री सुरु असून, अहमदनगर शहरातच वेगळ्या पध्दतीने निर्णय घेतले जात आहेत. - बहिरनाथ वाकळे, माजी नगरसेवक

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here