नयन तांदळे टोळीवर चोरी, बनावट पोलीस ओळखपत्र बनविण्याचा गुन्हा दाखल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, May 29, 2021

नयन तांदळे टोळीवर चोरी, बनावट पोलीस ओळखपत्र बनविण्याचा गुन्हा दाखल.

 नयन तांदळे टोळीवर चोरी, बनावट पोलीस ओळखपत्र बनविण्याचा गुन्हा दाखल.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सुपा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्काच्या गुन्ह्यातील कुख्यात नयन तांदळे टोळी यांनी आणखी गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले  आहे. मोक्काच्या  गुन्ह्याचा तपास करीत असताना ऊूीि संदीप मिटके यांच्या निदर्शनास आले की, नयन तांदळे व त्याचे साथीदार यांनी चोरी आणि बनावट पोलीस ओळखपत्र बनवण्याचा गुन्हा केलाआहे त्यावरून तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून नयन तांदळे टोळीस मोठा झटका दिला आहे.
फिर्यादी महेश  साहेबराव ससे वय 29 वर्ष धंदा व्यवसाय रा.झोपडी कॅन्टीन अहमदनगर यांचे दि 21/12/2020 रोजी नगर मनमाड रोड वरील झोपडी कॅन्टीन जवळील येवले चहाचे दुकाना समोरून  नयन तांदळे व त्याचे साथीदारांनी फिर्यादी हे चहा पिण्याकरिता गेले असता त्यांचे खिशातील पाकीट चोरून त्यामध्ये असणारे फोटोचा गैरवापर करून बनावट पोलीस ओळखपत्र तयार करून फिर्यादीची तसेच  पोलिस विभागाची फसवणूक केली आहे त्यानुसार नयन तांदळे टोळी विरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशन येथे.वरील दिलेल्या मजकूरचे फिर्यादी वरून अजून एक गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास -.झ.ख.मुंडे हे करत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here