नगर तालुका पोलीस स्टेशन ची धडाकेबाज कामगिरी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 11, 2021

नगर तालुका पोलीस स्टेशन ची धडाकेबाज कामगिरी

 पाच लाखाच्या मुद्देमालासह आरोपीला अटक

नगर तालुका पोलीस स्टेशन ची धडाकेबाज कामगिरीनगरी दवंडी

चिचोंडी पाटील : (वार्ताहर)

 कामरगाव येथे अपघात करून दोन व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला रेकॉर्डवरील सराईत आरोपी उमेश उर्फ ओंकार मधुकर शिंदे रा. पिंपरीआंतरवन जि.बीड नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये त्याच्या ताब्यातील चोरीचे वाहन क्रमांक एम एच बारा एच एन ८४६२ हे रस्त्याने भरधाव वेगात चालून दोन व्यक्तींचा अपघात करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत होऊन वाहनांचे नुकसानीस कारणीभूत झाला व सदरचा गुन्हा करून आरोपी फरार झाला होता.सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सुरू होता.

सदरच्या गुन्ह्याचे तपासादरम्यान मिळालेल्या बातमीनुसार नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस उपनिरीक्षक  जारवाल,पो.ना.राहुल शिंदे,पो. ना.अशोक मरकड,महिला पो.ना.प्रमिला गायकवाड,पो.कॉ. धर्मराज दहिफळे नगर तालुका पोलीस स्टेशन यांचे पथकाने आरोपी नामे उमेश उर्फ ओंकार मधुकर शिंदे रा. पिंपरी आंतरवन जि.बीड यास अपघातातील वाहन क्रमांक एम एच १२ एच एन ८४६२ सह दिनांक १०/५/२०२१ रोजी ताब्यात घेतले आहे.सदर आरोपीस विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सदर अपघातातील वाहन हे आरोपीने हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गोदरेज कंपनी समोरून चोरून आणल्याची कबुली दिली असून त्याबाबत हिंजवडी पोलीस स्टेशन जिल्हा पुणे येथे गु.र.न. ३२५/२०२१ भा.द.वि.क.३७९ दाखल असल्याने हिंजवडी पोलिस स्टेशनचे गुन्ह्यातील पाच लाखाची बोलेरो वाहनासह आरोपी मिळून आला आहे. सदर आरोपी कडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदर आरोपी विरुद्ध बीड शहर,नगर तालुका पोलीस स्टेशन, बीड ग्रामीण,शिवाजीनगर, हिंजवडी पोलीस स्टेशन आदी ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल,उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील,पोलिस निरीक्षक यांचे मार्गदर्शन आणि मिळालेल्या बातमीप्रमाणे नगर तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस उपनिरीक्षक जारवाल,पो.ना. राहुल शिंदे,पो.ना. अशोक मरकड,महिला पो. ना.प्रमिला गायकवाड,पो.कॉ. दहिफळे नगर तालुका पोलीस स्टेशन यांचे पथकाने सदरची कारवाई केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप करीत आहेत.

No comments:

Post a Comment