मनपाच्या नियोजन शून्य कारभारामुळे नगरमध्ये वाढतोय कोरोना-ॲड. अनुराधा येवले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 11, 2021

मनपाच्या नियोजन शून्य कारभारामुळे नगरमध्ये वाढतोय कोरोना-ॲड. अनुराधा येवले

 मनपाच्या नियोजन शून्य कारभारामुळे नगरमध्ये वाढतोय कोरोना-ॲड. अनुराधा येवले

लसीकरणाची प्रक्रिया ऑफलाईन चालू करण्याची मागणीनगरी दवंडी

अहमदनगर प्रतिनिधी- नगर शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. महापालिका प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे नगर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय लोकांचे जीव धोक्यात आले आहे या सर्व गोष्टींना जबाबदार मनपा आहे असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या ॲड.अनुराधा येवले यांनी केला आहे. मनपाच्या लसीकरण केंद्रावर गोंधळ सुरू आहे लसीकरण केंद्रावर नागरिकांची हेळसांड केली जाते ऑनलाइन नोंदणी असेल तरच लसीकरण दिले जाईल असे मनपा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येते परंतु अशिक्षित नागरिकांनी ऑनलाइन लसीकरण नोंदणी कशी करायची त्यांच्यासमोर खूप मोठा प्रश्न उपस्थित राहत आहे अशामध्ये ऑनलाइन लसीकरण योजना तातडीने थांबवा व  ऑफलाईन लसीकरण करा अशी मागणी येवले यांनी केली आहे.मनपा प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारा मुळे लसीकरण केंद्रावर नागरिकांचे हाल होत आहे आणि महत्त्वाचे म्हणजे चार लाख लोकसंख्या असलेल्या शहरात फक्त 7 लसीकरण केंद्र आहेत आणि प्रत्येक केंद्राच्या अधिकारात हजारो लोक आहेत आणि प्रत्येक केंद्रावर लस फक्त 30 ते 40 च्या प्रमाणात लस उपलब्ध होते,शेकडो नागरिक पहाटे 5 वाजल्यापासून केंद्राबाहेर लांबच-लांब रांगा लावतात संबंधित केंद्र प्रमुख व इतर कर्मचाऱ्यांना विचारले असता आम्ही स्वतः जीव मुठीत धरून काम करत आहोत इतक्या मोठ्या संख्येने नागरिकांना आम्हाला तोंड द्यावे लागते, पण लस वाटप ही आयुक्तांना अधिकार आहे आम्ही काही करू शकत नाही असे उत्तर लसीकरण केंद्र प्रमुख नागरिकान देतात. महापालिका आयुक्त, आरोग्य अधिकारी,महापौर याचे कोरोना संकट काळात कुठेही लक्ष नाही यांच्यामध्ये कुठलेही नियोजन नाही त्यामुळे नागरिकांना कोरोना मध्ये व्यवस्थित उपचार मिळत नाही त्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू होत आहे.या सर्व घटनांना कारणीभूत मनपा प्रशासन आहे अशी टीका आज प्रसार माध्यमाशी बोलताना ॲड. अनुराधा येवले यांनी व्यक्त केली. तसेच येत्या दोन दिवसात महापालिका प्रशासनाने लसीकरण केंद्राचा कारभार सुरळीत न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असा इशारा येवले यांनी दिला.

No comments:

Post a Comment