नेवासा व नेवासा फाटा परिसरात उघड्या असलेल्या दुकानांवर कारवाई. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 8, 2021

नेवासा व नेवासा फाटा परिसरात उघड्या असलेल्या दुकानांवर कारवाई.

 जेव्हा प्रांताधिकारी गणेश पवारआणि पोलिस निरीक्षक विजय करे यांनी घेतला हातात दंडुका;

 नेवासा व नेवासा फाटा परिसरात उघड्या असलेल्या दुकानांवर कारवाई. नगरी दवंडी

नेवासा: ‘ब्रेक द चेन’ मोहिमेअंतर्गत कडक निर्बंध लागू केले असताना केवळ सकाळी ०७:०० ते ११:०० या वेळेत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी आहे. मात्र या कालावधीत नंतर ही अत्यावश्यक सेवा व अन्य जे दुकाने सुरू राहत आहेत, त्यांच्यावर प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. 

काल प्रांताधिकारी गणेश पवार व पोलीस निरीक्षक विजय करे यांनी नेवासा बस स्टॅण्ड परिसर नेवासा फाटा येथील उघड्या असलेल्या दुकानावर दंडात्मक कारवाई केली.

अचानक सुरू झालेल्या या कारवाईने अर्धे शटर उघडे ठेवून व्यवसाय करणाऱ्यांची चांगलीच पळपळ झाली या कारवाईचे नेवासा व नेवासा फाटा परिसरातून प्रशासनाचे कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment