श्री योग वेदांत सेवा समिती कडून रिक्षा चालकांना किराणा वाटप
नगरी दवंडी
नगर -महामारीच्या काळात अनेकांचे रोजगार ठप्प झाले आहेत.अनेकांसमोर रोजी -रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे .अशा परिस्थितीत जायचे कुठे खायचे काय असा प्रश्न हातावर पोट असणा-याना भेडसावतो आहे.हीच गरज लक्षात घेऊन श्री योग वेदांत सेवा समितीने शहरातील रिक्षा चालकांना किराणा वाटप केले.गाडगीळ पटांगण येथे आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून जयभाई रंगलानी हे उपस्थित होते .प्रमुख पाहुणे म्हणून सेवा समितीचे शिवाजी शेळके हे होते.उपस्थितांचा परिचय आणि कार्यक्रमाचे स्वरूप दत्ता वामन यांनी सांगितले.अध्यक्ष स्थानांवरून बोलताना जय रंगलानी म्हणाले ''गरजूना मदत करणे हीच ईश्वर सेवा आहे.संतांची हीच शिकवण आहे.म्हणून प्रत्येकाने आपापल्या परीने मदत केली पाहिजे.मदतीसाठी पुढे आले पाहिजे.प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना शिवाजी शेळके म्हणाले अन्नदान सर्व श्रेष्ठ दान आहे.गरजवंतांना मदत करणे पुण्य आहे .रिक्षा चालकांना रोजा-रोटीचा प्रश्न निर्माण झाल्याने श्री योग्य वेदांत सेवा समिंतीने किराणा देण्याचे ठरवले आणि आज याचे वाटप झाले. आटा,साखर ,चहा,मीठ ,अश्या अनेक रोज लागण-या वस्तूंचा समावेश या किराणा किट मध्ये केला आहे.जय रंगलानी,शिवाजी शेळके याचे हस्ते रिक्षाचालकांना किट वाटप केले .अनेक रिक्षाचालकांनी या मदतीचा लाभ घेतला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमित गर्भे ,नंदकुमार रोहोकले,प्रकाश जाधव,देवकर साहेब ,विजय देवकर,हेमंत पडदुणे,जीवन गायकवाड,विनायक वाघ,अनिल वाघ ,राजू वाडेकर सतीश पडदुणे,सांगळे ताई ,ढोकणे ताई योगेश तळवले,आदींनी परिश्रम घेतले.नंदकुमार रोहोकले यांनी आभार मानले.संत श्री आशारामजी बापू अवतरण दिना निमित्त हा कार्यक्रम घेणयात आला.
No comments:
Post a Comment