वांबोरी येथे तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्सीजन प्लॅन्टची उभारणी करण्यात येणार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 8, 2021

वांबोरी येथे तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्सीजन प्लॅन्टची उभारणी करण्यात येणार

 वांबोरी येथे तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्सीजन प्लॅन्टची उभारणी करण्यात येणार



नगरी दवंडी

राहुरी ( प्रतिनिधी ) ८ मे

तालुक्यातील वांबोरी ग्रामीण रुग्णालय येथे ऊर्जा राज्यमंत्री  तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोटी ५३ लाख रुपये खर्चाच्या ऑक्सिजन प्लॅन्टची उभारणी करण्यात येणार असून ७० ऑक्सिजनचे बेड उपलब्ध करण्यात येणार आहेत .

या जागेची पाहणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे , प्रांताधिकारी दयानंद जगताप , तहसीलदार एफ आर शेख यांनी नुकतीच केली .

वांबोरी येथे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्लॅन्टमधून रोज ११५ ऑक्सिजन सिलेंडरची निर्मिती होऊन परीसरासह बाहेरही ऑक्सिजनचा पुरवठा होईल . अशा ऑक्सिजन प्लांटच्या जागेची व ७० ऑक्सिजन बेड उपलब्ध होतील , अशा कोविड सेंटरच्या जागेची पाहणी केली . यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे प्रांताधिकारी जगताप , तहसीलदार शेख , वांबोरीचे तलाठी पडळकर , ग्रामीण रुग्णालयाचे डॉ . पाठक , डॉ . श्रीमती पेचे , ग्रामविकास अधिकारी बी . के . गागरे , शिवसेना शहराध्यक्ष एकनाथ गवते , विशाल पारख , मनोज देशमाने , आदी उपस्थित होते .

No comments:

Post a Comment