कोविड काळात माणुसकीच्या नात्याने अधिकाधिक गरजूंना मदत केली पाहिजे : विकी मुथा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 26, 2021

कोविड काळात माणुसकीच्या नात्याने अधिकाधिक गरजूंना मदत केली पाहिजे : विकी मुथा

 कोविड काळात माणुसकीच्या नात्याने अधिकाधिक गरजूंना मदत केली पाहिजे : विकी मुथा

जैन ओसवाल वात्सल्य संस्थेतर्फे 70 गरजू कुटुंबांना किराणा वाटप


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः समाजात अनेक गरजू् आपल्या आसपास असतात. त्यांनाही जगण्याची उमेद असते. विशेषत: आताच्या कोविड काळात तर त्यांना माणुसकीच्या नात्याने अधिकाधिक मदत केली पाहिजे. आपली संस्कृती नेहमी इतरांच्या उपयोगी पडण्याची शिकवण देते. सढळ हाताने मदत करणार्यांना परमेश्वरही कधी काही कमी पडू देत नाही. अशाच उदात्त भावनेने जैन ओसवाल वात्सल्य संस्था गरजूंना सातत्याने आधार देत आहे. या कार्यात सहभागी होणे नेहमीच आनंददायी असते, असे प्रतिपादन ऍड.विकी दिलीप मुथा यांनी व्यक्त केले.
जैन ओसवाल वात्सल्य संस्थेच्या वतीने दर महिन्याप्रमाणे याही महिन्यात 70 गरजू कुटुंबांना महिनाभराचा किराणा देण्यात आला. ऍड.विकी मुथा यांनी आपले वडील ऍड.दिलीप मुथा यांच्या स्मरणार्थ ही मदत केली. ऍड.विकी मुथा, अजय वसंतलाल बोरा, विजय मुथा (वर्धमान) यांच्या हस्ते किराणा किटचे वाटप करण्यात आले. जय आनंद मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष नंदलाल कोठारी यांच्या शोभानंद निवासस्थानी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अजय वसंतलाल बोरा, विजय मुथा (वर्धमान), संस्थेचे अध्यक्ष अजित बोरा, सेक्रेटरी विजय गुगळे, नंदलाल कोठारी, किशोर पितळे, सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेचे चेअरमन ईश्वर बोरा, विजय गुगळे, महेश गुगळे, नूतन गांधी, संतोष कर्नावट आदी उपस्थित होते.
या उपक्रमासाठी सौरभ बोरा, प्रमिला बोरा, सी.ए.रमेश फिरोदिया, सविता रमेश फिरोदिया, अमित राजेंद्र चोपडा, पनालाल बोगावत, अजय अतुल बोरा, अभय श्रीश्रीमाळ, सतिष मुथा, किशोर गुगळे आदींचे सहकार्य लाभले.
विजय मुथा म्हणाले की, सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा यांचा आदर्श समोर ठेवून संस्था सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. किराणा वाटपाचा हा उपक्रम सातत्यपूर्ण असून संस्थेच्या चांगल्या कार्यामुळे अनेकांचे मदतीचे हात पुढे येत आहेत.
अजय वसंतलाल बोरा म्हणाले की, करोना काळात लॉकडाऊनमुळे अनेकांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. परंतु, या संकटातही जैन ओसवाल वात्सल्य सारख्या संस्था गरजवंतांना आधार देण्याचे काम करीत आहे. अशा संस्थांमुळेच मोठ्या संकटाचा सामना करण्याची ताकद अनेकांना मिळते. संस्थेचे अध्यक्ष अजित बोरा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सेके्रटरी विजय गुगळे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment