समाजच्या सेवेसाठी रोटरी क्लब प्रियदर्शनीचे योगदान ः गीता गिल्डा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 26, 2021

समाजच्या सेवेसाठी रोटरी क्लब प्रियदर्शनीचे योगदान ः गीता गिल्डा

 समाजच्या सेवेसाठी रोटरी क्लब प्रियदर्शनीचे योगदान ः गीता गिल्डा

लसीकरण केंद्राला रोटरी प्रियदर्शनी क्लबची मदत

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः करोनाच्या आलेल्या संकट काळात रोटरी क्लब प्रियदर्शनिच्या माध्यमातून विविध मदत कार्य चालू आहे. करोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रांवर सेवा देणार्‍या कार्माचारींना व येणार्‍या नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठीही  क्लबच्या वतीने सावेडीच्या लसीकरण केंद्राला मदत केली आहे. समाजच्या सेवेसाठी रोटरी क्लब प्रियदर्शनी योगदान देत आहे, असे प्रतिपादन रोटरी क्लब प्रियदर्शनिच्या अध्यक्षा गीता गिल्डा यांनी केले.
रोटरी क्लब प्रियदर्शनिच्या वतीने सावेडी मधील मनपाच्या स्पर्धा परिक्षा केंद्रातील लसीकरण केंद्राला दोन उभे फॅन, कर्मचार्‍यांसाठी मिनिरल वॉटरचे बॉक्स व एनर्जी ड्रिंक अशी मदत करण्यात आली. यावेळी प्रियदर्शनिच्या अध्यक्षा गीता गिल्डा, भाजपचे शहर अध्यक्ष भैय्या गंधे, सदस्या वैशाली कोलते, प्रतिभा धूत, कुंदा हळबे, नीता देवराईकर, डॉ.बिंदू शिरसाठ, केंद्राच्या प्रमुख डॉ.एस.व्ही. चीलवा, भाऊसाहेब सुडके आदी उपस्थित होते. या उपक्रमासाठी भैय्या गंधे यांनी समंवयकाची भूमिका बजावली. भैय्या गंधे म्हणाले, रोटरी क्लब प्रियदर्शनिच्या अध्यक्षा गीता गिल्डा यांच्या कडे मागणी केल्या वर त्यांनी तातडीने स्व.प्रमोद महाजन स्पर्धा परिक्षा केंद्रामधील लसीकरण सेंटरला अत्यावश्यक मदत केली आहे. करोनाच्या संकट काळात रोटरी क्लब प्रियदर्शनी करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. यावेळी भाजपा युवामोर्चाचे मल्हार गंधे, ऋग्वेद गंधे, अमेय भांबूरे, सिद्धेश नाकाडे, अभिषेक वराळे, हुजेफ शेख, चिन्मय खिस्ती, सुनील पांडूळे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment