राष्ट्रवादीचे पदाधिकारी सोशल मीडियातून बदनामी करतात - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 26, 2021

राष्ट्रवादीचे पदाधिकारी सोशल मीडियातून बदनामी करतात

 राष्ट्रवादीचे पदाधिकारी सोशल मीडियातून बदनामी करतात

भाजपाचा आरोप प्रशासनाला कारवाई करण्यासाठी निवेदन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः सोशल मीडियावर वैयक्तिक बदनामी करून भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना धमकी देणार्‍या  राष्ट्रवादीच्या गुंड प्रवृत्तीच्या पदाधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन भाजपाच्या पदाधिकार्‍यानी कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे सह जिल्हाधिकारी  यांना दिले.
कर्जत तालुक्यासाठी सुटणार्‍या कुकडीच्या आवर्तनाला  उशीर झाल्यामुळे कर्जत तालुक्यातील शेतकर्‍यांची पिके आणि फळबागा जळून गेल्यामुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच लोकांना आणि जनावरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यातच भर म्हणून कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी कर्जत तालुक्यातील पदाधिकार्‍याची कुकडी सल्लागार समितीवर प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करणे आवश्यक असताना कर्जत तालुक्याच्या वतीने प्रतिनिधी म्हणून श्रीगोंदा तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार यांची कुकडीच्या सल्लागार समितीवर  नियुक्ती केली. या प्रकरणी विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या वतीने आवाज उठवण्यात आला, त्यावर राष्ट्रवादीचे पदाधिकारी असलेले दीपक यादव व त्यांचे बंधू सुधीर यादव हे सातत्याने सोशल मीडिया मधूूून भाजपाच्या  नेत्यांवर एकेरी भाषेत उल्लेख करून चिखलफेक करत आहेत. भाजपाच्या कार्यकर्त्यांची व पदाधिकार्‍यांची वैयक्तिक बदनामी सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. तसेच जे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या विरोधात सोशल मिडीयावर कमेंट करतात यांना दमबाजी करून त्यांची सोशल मीडियावर कौटुंबिक व वैयक्तिक बदनामी केली जात असून सोशल मीडिया वरच अनेक भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात आहेत तसेच आमदार रोहित पवार यांच्या विरोधात जो कोणी बोलेल त्याला आम्ही सोडणार नाही. असे बोलून लोकशाहीची गळचेपी करत आहेत, राष्ट्रवादीच्या पदाधिकार्याकडून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवरही असभ्य भाषेत कमेंट केल्या जात असल्याचे ही या निवेदनात म्हटले आहे प्रशासनाने या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर योग्य ती कडक कारवाई करावी अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने या गुंडगिरीच्या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून दिला आहे. या निवेदनावर भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ सुनील गावडे, भाजपाचे जेष्ठ नेते अल्लाउद्दीन काझी, माजी जिल्हा परिषद सदस्य शांतीलाल कोपनर, कर्जत नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सुनील यादव, तात्यासाहेब माने, धनंजय मोरे, नितीन लोंढे पाटील,  पप्पू शेठ धोदाड, राहुल निंभोरे, पांडुरंग भंडारे, सुनील काळे, एकनाथ धोंडे, सोयब काझी, गणेश जंजिरे, गोपीनाथ जगताप, अमोल आरडे, सुहास गावडे, महेंद्र धांडे, विठ्ठल अनभुले, आदींच्या स्वाक्षर्या आहेत यावेळी तहसीलदारांना निवेदन देताना कुकडीच्या पाण्या संदर्भात  जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ सुनिल गावडे, जिल्हाप्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे व कीसान आघाडीचे जिल्हा सरचिटणीस सुनिल यादव यांची भाषणे झाले.

No comments:

Post a Comment