कोरोनासंदर्भातील गंभीर परिस्थीस राज्य सरकारचं जबाबदार आहे माजी मंत्री रामशिंदेचा आघाडी सरकारवर घणाघाती आरोप..... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 11, 2021

कोरोनासंदर्भातील गंभीर परिस्थीस राज्य सरकारचं जबाबदार आहे माजी मंत्री रामशिंदेचा आघाडी सरकारवर घणाघाती आरोप.....

 कोरोनासंदर्भातील गंभीर परिस्थीस राज्य सरकारचं जबाबदार आहे माजी मंत्री रामशिंदेचा आघाडी सरकारवर घणाघाती आरोप..... 



नगरी दवंडी

तालुका प्रतिनिधी 

जामखेड - जामखेड तालुका व सर्वच परिसरातील को व्हीड रुग्णालयास भेट दिली व तेयील सोयी सुविधा संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा बऱ्याच गंभीर गोष्टींचा खुलासा समोर आला असुन ही अतीशय गंभीर बाब आहे कारण येयील प्रत्येक हॉस्पीटल मध्ये बेड भरपुर शिल्लक आहेत परंतु ऑक्सीजन पुरवठा होत नाही तसेच कोरोना रुग्णासाठी वाचण्याचा शेवटचा उपाय म्हणुन वापरले जाणारे रेमडीसीवर इजेक्शन चा तुटवडा निर्माण झालाय ते इजेक्शन मिळत नसल्याने कित्येक जणांना जीव गमवावा लागत आहे याला जबाबदार दुसरे तिसरे कोणी नसुन लोकप्रतीनिधी व राज्य सरकार हेच जबाबदार आहेत त्यांनी त्यांची नैतीक जबाबदारी समजुन हे सर्व सुरळीत करणे गरजेचे असताना देखील राज्य सरकार व त्यांचे राज्य कर्ते दुर्लक्ष करत लोकांच्या जीवाशी खेळताहेत हे बरोबर नाही तसेच ऑक्सीजन पुरवठा सुरळीत करणे ही तर सर्वस्वी राज्य सरकारची जबाबदारी असताना लोकप्रती निधी काय करतात लोकांची गंभीर परिस्थीती झाली आहे त्यातच अरणगाव खर्डा नान्नज या ठिकाणी असणाऱ्या प्राथमीक  आरोग्य केद्रांत कोव्हीड तपासणी व उपचार सुरु करणे गरजेचे आहे त्याकडेही जाणुनबुजुन दुर्लक्ष केले जात असुन जनतेच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे लवकरात लवकर या प्राथमीक केद्रांत कोव्हीड रुग्णाच्या तपासणी व उपचार चालु केल्यास जामखेड ला होणार ताण कमी होऊन कोरोना संसर्ग कमी होण्यास मदत होईल तसेच शासनाचे अधिकारी या संदर्भात माहीती देत नाहीत त्यांनी दिलेली माहिती हि चुकीची व संशयास्पद आहे असे वाटते कारण येयील वैदकीय अधिकारी अथवा प्रशासनातील सर्वच जबाबदारी अधिकारी कुठल्या तरी दबावात काम करत असल्याचे दिसुन येते आहे तेव्हा अशा बिकट परिस्थीत जनतेच्या मदतीसाठी धाऊन गेले पाहीजे लोकांचे जीव वाचवले पाहीजेत सर्व सोयीसुवीधा पुरवणे गरजेचे असताना केवळ सर्व सावळा गोंधळ करून राज्य सरकार व सरकारचे प्रती निधी गाफील असल्याने राज्यासह जामखेड तालुक्याची परिस्थीती गंभीर होत असले चा आरोप भाजपाचे माजी मंत्री राम शिंदे यांनी जामखेड येथील शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेतुन केला असून आघाडी सरकार व त्यांचे प्रती निधी यास जबाबदार असल्याचे स्पष्ट केले

No comments:

Post a Comment