" या" गावात घेतली पहिल्यांदा रॅपीड टेस्ट अन नंतर झाले लसीकरण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 11, 2021

" या" गावात घेतली पहिल्यांदा रॅपीड टेस्ट अन नंतर झाले लसीकरण

 " या" गावात घेतली पहिल्यांदा रॅपीड टेस्ट अन नंतर झाले लसीकरणनगरी दवंडी / प्रतिनिधी 

   अहमदनगर :  पंचेचाळीस वर्षा पुढील व्यक्तिंना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. मात्र आगोदर सर्वांची रॅपीड अॅटी जन तपासणी केली नंतर लसीकरण करण्यात आले. आता पहिला डोस असो का दुसरा डोस रॅपीड अॅटीजन करणे बंधनकारक आहे तरच लस घेता येणार आहे.नगर तालुक्यातील येथे लसीकरण मोहीम राबविण्यात आली.या शिबिरासाठी नगर तालुका पंचायत समितीचे उपसभापती डॉ. दिलीप पवार व सरपंच परिषद मुंबई अहमदनगर जिल्हाध्यक्ष तथा हिंगणगावचे सरपंच आबासाहेब सोनवणे यांच्या हस्ते शिबीर घेण्यात आले.

      या शिबिरामध्ये ज्या व्यक्तींना पहिला डोस घेऊन  ४५ ते ६० दिवस झाले होते अशा ७९ व्यक्तींची रॅपिड एंटीजन चाचणी करून लसीकरण करण्यात आले यामध्ये एकही व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह आढळली नाही.

     लसीकरणासाठी जखणगाव उपकेंद्राच्या समुदय अधिकारी डॉक्टर वृषाली झावरे, आरोग्य सेवक विक्रम ससे,आरोग्य सेविका पुष्पाताई मगर,आशा सेविका नंदाताई सोनवणे व संगीता पाडळे यांच्या उपस्थितीत शिबिर घेण्यात आले.शिबिर यशस्वी करण्यासाठी उपसरपंच बाळासाहेब ढगे, बाळासाहेब पानसरे,ग्रामपंचायत सदस्य मुकुंद दुबे,वैभव ताकपेरे ग्रामसेविका सुजाता खर्से,सामाजिक कार्यकर्ते निसार पठाण, मयूर सुंबे यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment