सोशल फौंडेशनचे कार्यकर्ते माणुसकी जिवंत ठेवण्याचे काम पद्मशाली करत आहेत ः लक्षेट्टी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, May 28, 2021

सोशल फौंडेशनचे कार्यकर्ते माणुसकी जिवंत ठेवण्याचे काम पद्मशाली करत आहेत ः लक्षेट्टी

 सोशल फौंडेशनचे कार्यकर्ते माणुसकी जिवंत ठेवण्याचे काम पद्मशाली करत आहेत ः लक्षेट्टी

पद्मशाली सोशल फौंडेशनच्यावतीने डवरी गोसावी
समाजातील गरजू कुटुंबांना किराणा साहित्य वाटप


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः आज समाजात अनेक असे कुटुंब आहेत, त्यांना रोजगार मिळाला तरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. पण सध्या कोरोणा या महामारी मुळे लॉक डाऊन परिस्थीती आल्याने गरीब गरजू आणि बहुरूपी नक्कल करणार्‍या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली, अशा परिस्थितीत आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून आपण त्यांना मदत केली, याच भावनेतून पद्मशाली सोशल फाउंडेशन च्या कार्यकर्त्यांनी अशाच गरीब गरजू आणि बहुरूपी समाजाच्या लोकांना मदत  करून माणुसकी जिवंत असल्याचे  दाखवून दिले असे प्रतिपादन सौ.शिवानीताई लक्षेट्टी यांनी केले.
पद्मशाली सोशल फाउंडेशन च्या वतीने टाकळी काजी येथील पाला वरील बहुरूपी समाजातील 40 गरीब गरजू लोकांना दहा दिवस पुरेल असे किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी पद्मशाली सोशल फाउंडेशन चे मार्गदर्शक गणेश लक्षेट्टी, अध्यक्ष रोहित गुंडू, अजय लयचेट्टी, सामाजिक कार्यकर्ते योगीराज गुंड,प्रकाश कोटा, श्रीनिवास बुरगुल, शुभम सुंकी, आकाश अरकल,वरद लक्षेट्टी, वैभव अरकल, राहुल पासकंटी, श्रावणी लक्षेट्टी आदी उपस्थित होते.
यावेळी पद्मशाली सोशल फाउंडेशन चे मार्गदर्शक गणेश लक्षेट्टी बोलताना म्हणाले , नगर तालुक्यातील टाकळी काझी शिवारात डवरी गोसावी समाजाची सुमारे 50 पाल आहेत. पालावरील पोरं दारोदार जाऊन बहुरुप्याचं सोंग घेऊ नकला सादर करून पोटाची खळगी भरवतात. मात्र कोरोनामुळे त्यांच्यासाठी लोकांची दारं बंद झाली.शासन, समाजातून मदतीचे हातपुढे आले तर त्यांचे चार दिवस तरी ढकलतील या माणुसकीच्या भावनेतून पद्मशाली सोशल फाउंडेशन च्या वतीने पालावरील 50 कुटुंबीयांना दहा दिवस पुरेल असे किराणा साहित्य देण्यात आले. यावेळी फाउंडेशन च्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये लॉक डाऊन काळात गरजूंना मोफत जेवण, किराणा वाटप असे उपक्रम राबविण्यात आले. गरजूंच्या मदतीसाठी फाउंडेशन च्या वतीने येणार्‍या काळात अनेक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज गुंड यांनी केले.

No comments:

Post a Comment