भातोडीत जनता कर्फ्यू, गाव बंदचा स्वयंस्फूर्तीने निर्णय - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, May 28, 2021

भातोडीत जनता कर्फ्यू, गाव बंदचा स्वयंस्फूर्तीने निर्णय

 भातोडीत जनता कर्फ्यू, गाव बंदचा स्वयंस्फूर्तीने निर्णय

नगरी दवंडी/प्रतिनिधी
चिचोंडी पाटील ः नगर तालुक्यातील ऐतिहासिक भातोडी गावांमध्ये कोरोना ग्राम सुरक्षा समिती व भातोडी ग्रामस्थ यांच्या निर्णयान्वये भातोडी मध्ये गावात जनता कर्फ्यू लागू करून गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोना रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा अनुषंगाने कोरोना ग्राम सुरक्षा समितीने,जनता कर्फ्यू मध्ये भातोडी गावामध्ये निर्बंध लागू केले आहेत.
भातोडी येथील सर्व ग्रामस्थांना व परिसरातील नागरिकांना याद्वारे कळविण्यात येतेकी गावातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे भातोडी गावात शुक्रवार दि.28 मे 2021 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते मंगळवार दिनांक 1 जून 2021 सकाळी 7 वाजेपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय ग्रामस्थांनी व कोरोना सुरक्षा समिती यांनी स्वयंस्फूर्तीने घेतला आहे या काळात संपूर्ण गाव शंभर टक्के बंद राहणार आहे जर या कालावधीत कोणतेही नागरीक विना मास्क  अथवा योग्य कारण नसताना फिरताना दिसल्यास किंवा कोणतेही दुकान, हॉटेल उघडले दिसल्यास दंडात्मक कार्यवाही होणार आहे. सर्व ग्रामस्थांनी याची नोंद घ्यावी. आपल्या गावची काळजी आपण घेतल्यास निश्चितच कोरोना पॉझिटिव्ह संख्या गावातील कमी होऊन, महामारी कमी होईल यासाठी शासकीय नियमाचे पालन करून शंभर टक्के गाव बंद ठेवून सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे,असे आवाहन कोरोना ग्राम सुरक्षा समिती भातोडी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here