इव्हेजलीन बुथ हॉस्पिटलला नाशिक धर्मप्रांतातफे औषधांची भेट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 4, 2021

इव्हेजलीन बुथ हॉस्पिटलला नाशिक धर्मप्रांतातफे औषधांची भेट

 इव्हेजलीन बुथ हॉस्पिटलला नाशिक धर्मप्रांतातफे औषधांची भेट

 


नगरी दवंडी

नगर  - दि.04 नगर येथील सॅलवेशन आर्मी संचलित इव्हेंजलीन बुथ हॉस्पिटल येथे मार्च 2020 पासून अविरतपणे कोरोना बाधित रुग्णांची निस्वार्थीपणे व निशुल्क सेवा करत आहे. या सेवेबद्दल बुथ हॉस्पिटलचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या हॉस्पिटलचे इव्हेजलीन बुथ हॉस्पिटलला नाशिक धर्मप्रांतातफे औषधांची भेट देण्यात आली.

आतापर्यंत 5 ते 6 हजारापर्यंत रुग्ण दवाखान्यात बरे होवून घरी परतले आहे. आजही रुग्ण येथे उपचार घेत आहे. इव्हेंजलीन बुथ हॉस्पिटलचे रुग्ण सेवेचे कार्य कौतुकास्पद आहे, असे उद्गार नाशिक धर्मप्रांताचे महाधर्मगुरु रेव्ह. शरद गायकवाड यांनी काढले व निशुलक सेवा करणार्‍या बुथ हॉस्टिटलमध्ये उपचार घेणार्‍या रुग्णांकरिता हॉस्पिटलची गरज लक्षात घेवून औषधांची भेट दिली.पुढील सेवाकार्याच्या वाटचालीस हॉस्पिटलच्या सर्व कर्मचार्‍यांना आशिर्वाद दिला.

ह्यावेळी सर्व कोरोना बाधित रुग्णांकरिता हॉस्पिटलच्या सर्व डॉकटर,नर्सेस, कर्मचार्‍यासाठी तसेच अहमदनगर जिल्हयामधील सर्व कोरोना बाधित रुग्णांसाठी बिशप यांनी विशेष प्रार्थना केली. बुथ हॉस्टिटलचे मेजर देवदान कळकृंबे, डॉ.केकान हयांनी बिशप यांचे आभार मानले.

हयावेळी सेंट सेव्हिअर्स कॅथेडूल येथिल धर्मगुरु रेव्ह. डि.डि. सोनावणे, रेव्ह. सतिश तोरणे तसेच दि चर्च ऑफ दि लॅम्बचे रेव्ह. रवि चांदेकर, नाशिक धर्मप्रांताचे कार्यकारिणी सदस्य प्रशांत पगारे, सेंट सेव्हिअर्स कॅथेडल या चर्चचे कमिटी सभासद सिसिल भक्त व राजेंद्र चव्हाण इ.उपस्थित होते.

No comments:

Post a Comment