ना ऑक्सिजन, ना रेमडेसिविर तरीही अनेक कोरोना रुग्ण या उपचाराने बरे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, May 4, 2021

ना ऑक्सिजन, ना रेमडेसिविर तरीही अनेक कोरोना रुग्ण या उपचाराने बरे.

 ना ऑक्सिजन, ना रेमडेसिविर तरीही अनेक कोरोना रुग्ण या उपचाराने बरे.नगरी दवंडी

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनामुळे सर्वच हॉस्पिटल गच्च भरले असताना, अनेक रुग्णांचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये बेड मिळण्यासाठी तर ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनसाठी पळापळ करताना दिसत आहे. मात्र कोरोना रुग्णांवर होमिओपॅथी उपचार पध्दती संजीवनी ठरली असून, शहरातील मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण होमिओपॅथीच्या औषधाने बरे झाले आहे. नागरिकांनी कोरोनाची लक्षणे आढळल्यास घाबरुन न जाता त्वरीत तपासणी करुन उपचार घेतल्यास हा आजार बरा होत असल्याची माहिती होमिओपॅथी तज्ञ डॉ. प्रमोद लंके यांनी दिली.

जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढले आहे. अनेक रुग्ण दगावत असताना सर्वसामान्यांमध्ये या आजाराची मोठी दहशत निर्माण झाली आहे. नागरिक कोरोनाची लक्षणे आढळून आल्यानंतर देखील तपासणी न करता, निष्काळजीपणा करत असल्याने कोरोनाचे संक्रमन वाढत आहे. तर हा आजार जीवघेणा ठरत आहे. कुठल्याही विषाणूजन्य आजारात ताप येणे हे त्याचे सर्वसामान्य लक्षणे असते. परंतु बहुतांश लोकांना ताप आल्यास ते घाबरून जातात व ताप घालवण्यासाठी वेगवेगळे उपचार करतात. जो ताप रुग्णांचे रक्षण करण्यासाठी शरीराने आणलेला आहे. तो ताप त्या विषाणूला रुग्णांमध्ये अति संक्रमण करू देत नाही. म्हणून पहिल्या टप्प्यात बहुतांशी रुग्णांमध्ये ताप गेला की, रुग्णाला निमोनिया होण्याची भीती वाढते. ही प्रक्रिया सर्वच रुग्णांमध्ये होते असे नाही. यातील वेगवेगळ्या रुग्णांचे वर्गीकरण करणे आवश्यक आहे. होमिओपॅथी औषध अचूक निवडल्यावर रुग्णांचा असणारा ताप एका उच्च बिंदूपर्यंत वाढून तो नाहीसा होतो व रुग्ण या आजारातून बरा होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

कोरोनाने बाधित झालेले संपुर्ण कुटुंब होमिओपॅथी औषधाने बरे झाले आहेत. त्यापैकी एकाची गंभीर परिस्थिती निर्माण होऊन निमोनिया झालेला रुग्ण पंधरा दिवसांनी विना ऑक्सिजनने बरा झाला. त्यांच्या पुण्यातील मावशीचा एचआरसिटीचा बारा स्कोर असतानादेखील डॉक्टरांच्या सल्ल्याने होमिओपॅथी उपचार करून घेतले. त्या रुग्णाचा एचआरसिटी स्कोर अवघ्या सात दिवसात पाच वर आला आहे. आनखी एक पुण्यात आयसीसूमध्ये ऑक्सिजनवर गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णाची प्रकृती सुधारली आहे. अनेक कोरोना रुग्ण ठणठणीत होत असल्याने होमिओपॅथी उपचार घेण्याकडे सर्वसामान्य नागरिकांचा कळ वाढला असल्याचे डॉ. लंके यांनी सांगितले.

---------------------------

कोरोना बाधित असलेल्या प्रत्येक रुग्णांना खूप थकवा येत असतो. अशा वेळेस त्यांना भरपूर प्रमाणात पाणी, सकस आहार घेऊन आराम करावा. आजारपणात श्रम केल्यास प्रतिकारशक्ती कमी होऊन हा आजार वाढण्याची भीती आहे. होमिओपॅथी औषध कोरोना रुग्णांच्या सर्व लक्षणांचा आढावा घेऊन प्रत्येक व्यक्तीचे वेगळे औषध निवडले जाते. ते औषध रुग्णास दिल्यानंतर रोग प्रतिकारक्षमतेला बळकटी मिळते व तीच संरक्षक प्रणाली या कोरोनाविषाणू विरुद्ध लढा देण्यासाठी उपयोगी ठरते. तर रुग्ण स्वतः कोरोनावर मात करून यशस्वी बरा होतो.  -डॉ. प्रमोद लंके (होमिओपॅथी तज्ञ)

--------------------------------------

होमिओपॅथी उपचार पध्दती घेऊन आमच्या कुटुंबातील सर्व सदस्य बरे झाले आहेत. घरातील निमोनिया झालेला ज्येष्ठ व्यक्ती देखील ठणठणीत बरा झाला आहे. टाळेबंदीतील आर्थिक अडचणीच्या काळात होमिओपॅथी उपचार पध्दत सर्वांना परवडणारी ठरणार असून, या औषधोपचाराने चांगला गुण आला आहे.  -प्रदिप मनोहर झरेकर (नगर)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here