कोरोना रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचे पाऊल - आ. जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, May 20, 2021

कोरोना रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचे पाऊल - आ. जगताप

 कोरोना रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचे पाऊल - आ. जगताप

राज्यात प्रथमच नगरमध्ये हमाल-माथाडी यांचे स्वतंत्र लसीकरण केंद्र


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. कोरोना रुग्णांना सर्व सोयी-सुविधा मिळवून देण्याबरोबरच कोरोना रोखण्यासाठी लसीकरण हे महत्वाचे पाऊल ठरत आहे. त्यामुळे सर्व नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी उपलब्ध लसीचे नियोजन करुन फ्रंटलाईन वर्कर यांना प्राधान्य दिले जात आहेत. हमाल-मापाडी हेही एकप्रकारे फ्रंटलाईन वर्कर आहेत. बाजार समिती, रेल्वे मालधक्का व इतर अनेक अत्यावश्यक सेवांमधील मालांची उचलसाचल करण्याचे काम हे हमाल-मापाडी करत आहेत. या घटकांचेही लसीकरण होणेही आवश्यक असल्याने प्राधान्यक्रमाने त्यांचे लसीकरण करण्यात येत  आहेत. राज्यात प्रथमच हमाल-मापाडी यांचे विशेष केंद्रातून लसीकरण होत आहे.  हमाल-मापाडी यांचे लसीकरण व्हावे, यासाठी हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी माझ्याकडे, शासनाकडे, मनपाकडे अशा विविध स्तरावर पाठपुरावा केला होता; आज त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन लसीकरण होत आहे. हमालांनीही लसीकरण करुन घेऊन आपली व कुटूंबियांची काळजी घ्यावी, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
हमाल-मापाडी कामगारांसाठी राज्यातील पहिल्या लसीकरण केंद्राचा शुभारंभ नगरमध्ये जिल्हा हमाल पंचायत येथे आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सहाय्यक  कामगार आयुक्ता चंद्रकांत राऊत, हमाल पंचायतीचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, विष्णूपंत म्हस्के, हनुमंत कातोरे, डॉ. विजय कवळे, उपाध्यक्ष गोविंद सांगळे, सचिव मधुकर केकान, संजय महापुरे, आरोग्य अधिकारी अनिल बोरगे, माथाडी मंडळाचे निरिक्षक सुनिल देवकर, नारायण गीते, संदिप भागाडे, भाऊसाहेब वाबळे,अनुरथ कदम, बहिरु कोतकर, सचिन ठुबे, स्वप्नील घुले, दत्तात्रय साबळे, एकनाथ भालेराव आदि उपस्थित होते. यावेळी बोलतांना अविनाश घुले म्हणाले, कोरोना काळातही हमाल-मापाडी यांनी जिवाची पर्वा न करतांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात मोठी महत्वपूर्ण भुमिका बजावली आहे. या हमाल-मापाडी कामगारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देऊन त्यांना विमा संरक्षण, तपासणी, कोविड सेंटर व हॉस्पिटलमध्ये राखीव जागा, लसीकरण आदि गोष्टीसाठी वेळोवेळी शासनस्तरावर पाठपुरवा केला. यासाठी आ.संग्राम जगताप व आ.रोहित पवार यांचे मोठे सहकार्य मिळाले. कोविड  तपासणी बरोबरच आता हमाल-मापाडी यांचे लसीकरण होत आहे. अशा दोन्ही सेवा एकच ठिकाणी होत असल्याने  कोरोनापासून बचाव होण्यास मदत होणार आहे. राज्यात हमाल-मापाडी यांच्यासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र नगरमध्ये सुरु होत आहे, ही आनंददायी बाब आहे. अशाच विविध उपक्रमांतून हमाल-मापाडी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहू, असे सांगितले. यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रकांत राऊत  हमाल हाही एक महत्वाचा घटक असल्याने त्यांनाही सर्व आरोग्य सुविधा मिळणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment