आनंदऋषीजी ब्लड सेंटरमध्ये प्लाझमा दान युनिट कार्यान्वित - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, May 20, 2021

आनंदऋषीजी ब्लड सेंटरमध्ये प्लाझमा दान युनिट कार्यान्वित

 आनंदऋषीजी ब्लड सेंटरमध्ये प्लाझमा दान युनिट कार्यान्वित

नव्या सेवेमुळे गरजू रूग्णांना मिळणार मोठा दिलासा

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जैन सोशल फेडरेशन सचंलित आनंदऋषीजी हॉस्पिटल संलग्नित आनंदऋषीजी ब्लड सेंटरला प्लाझमा डोनेट युनिटसाठी केंद्र सरकारच्या आरोग्य यंत्रणेची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता आनंदऋषीजी ब्लड सेंटर येथे इच्छुकांना प्लाझमा दान करता येणार आहे. याठिकाणी अनिकेत भंडारी यांनी प्लाझ्मा दान करून या युनिटमधील पहिले प्लाझ्मा डोनर होण्याचा मान मिळवला. त्यांचा जैन सोशल फेडरेशन तर्फे सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी नगरसेवक विपुल शेटिया, पोपट लोढा, धनेश कोठारी, मनिष लोढा, अनिकेत कौर, सी.ए.किरण भंडारी, सुरेश गायकवाड, राजू सोनार, डॉ. आशिष भंडारी, आनंदऋषीजी ब्लड सेंटरचे गणेश कांकरिया, अशोक कोठारी, जनसंपर्क अधिकारी सुनील महानोर आदी उपस्थित होते. करोना महामारीच्या काळात प्लाझमा संकलनाची मंजुरी मिळाल्याने अधिकाधिक करोना रूग्णांना प्लाझमा देण्याची सेवा पुरवता येणार असल्याचे जैन सोशल फेडरेशनच्यावतीने सांगण्यात आले. भगवान महावीर स्वामी यांच्या कृपेने, आचार्य आनंदऋषीजी म.सा.यांच्या कृपाशिर्वादाने व पूज्य आदर्शऋषीजी म.सा.यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले आनंदऋषीजी हॉस्पिटल रूग्णसेवेचे व्रत अखंडपणे चालवत आहे. हॉस्पिटलशी संलग्नित आनंदऋषीजी ब्लड सेंटर उच्च गुणवत्तेसाठी नावाजले जाते. याठिकाणी आता प्लाझमा डोनेटचीही व्यवस्था 19 मे पासून सुरु झाली आहे. कोविड रूग्णांसाठी प्लाझमा थेरपी परिणामकारक ठरत आहे. प्लाझमा मिळाल्याने अनेक रूग्णांचे जीव वाचल्याचा अनुभव डॉक्टर मंडळी सांगतात. ज्यांना करोना होवून गेलेला आहे, अशी मंडळी 28 दिवसांनंतर किंवा ज्यांचा अँटीबॉडी स्कोअर 15 च्या पुढे असेल अशा व्यक्ती प्लाझमा दान करण्याचे पुण्यकर्म करू शकतात. तरी प्लाझमा दान करण्यासाठी इच्छुकांनी आनंदऋषीजी ब्लड सेंटरशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. शेवटी गणेश कांकरिया यांनी आभार मानले. अधिक माहितीसाठी संपर्क 0241-2320472

No comments:

Post a Comment