प्र. क्र.13 च्या नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सुरू करा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, May 20, 2021

प्र. क्र.13 च्या नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सुरू करा

 प्र. क्र.13 च्या नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सुरू करा

नगरसेविका सोनाली चितळे यांची मागणी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः प्रभाग क्रमांक तेराच्या नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी नगरसेविका सौ. सोनाली चितळे यांनी आज आयुक्त व महापौर यांच्याकडे केली आहे. प्रभाग क्रमांक 13 मध्ये संपूर्ण नालेगाव दिल्लीगेट परिसर, आनंदी बाजार, पटवर्धन चौक, चितळे रोड, गांधी मैदान, सब जेल चौक, टिळक रोड, जुनी महानगरपालिका, गणेश वाडी, प्रभात कॉलनी, मूनोत इस्टेट, असा मोठा परिसर समाविष्ट आहे.  या भागातील लोकांच्या लसीकरणासाठी महात्मा फुले आरोग्य केंद्र उपलब्ध आहे. परंतु या ठिकाणी प्रभाग क्रमांक 12 च्या नागरिकांसाठी व स्टेशन रोडच्या नागरिकांसाठी सुद्धा या ठिकाणी सोय असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते.
सध्या 45 वर्षाच्या पुढील ज्येष्ठ नागरिकांचा दुसरा डोस चालू आहे. महात्मा फुले आरोग्य केंद्राची जागा खूप छोटी आहे. उन्हाचा तडाखा ही जास्त असल्याने या ठिकाणी टाकलेला मंडप ही अपुरा पडतो. त्यामुळे नागरिकांना उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता आहे. शिव पवन मंगल कार्यालय हे आकारमानाने मोठे मंगल कार्यालय आहे. एकाच वेळेला दोनशे ते तीनशे नागरिक याठिकाणी व्यवस्थित रित्या सावलीला बसू शकतात. लस देण्याचे काम या ठिकाणी पारदर्शकरित्या करता येईल. त्या ठिकाणी चहा पाण्याची व्यवस्था  करण्याची आमची तयारी आहे. महानगरपालिकेने शिव पवन मंगल कार्यालय हे विठ्ठल- रुक्मिणी पुरुष बचत गटाला कॉन्ट्रॅक्ट बेस वर चालविन्याकर्ता दिलेले आहे. विठ्ठल रुक्मिणी पुरुष बचत गटाने लसीकरण केंद्र चालू करण्यासाठी मान्यता दिलेली आहे. त्यांनी तसे पत्र माझ्याकडे आणून दिलेले आहे. असेही यावेळी नगरसेविका सोनाली चितळे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here