साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांचा शिर्डीतील सर्वपक्षीय ग्रामस्थांच्या वतीने सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, May 21, 2021

साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांचा शिर्डीतील सर्वपक्षीय ग्रामस्थांच्या वतीने सत्कार

 साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांचा शिर्डीतील सर्वपक्षीय ग्रामस्थांच्या वतीने सत्कार



नगरी दवंडी

शिर्डी प्रतिनिधी -

कोविड संकटाच्या काळात साईबाबा संस्थानच्या माध्यमातून अद्वितीय भुमीका बजावत साईबाबांचा आरोग्य सेवेचा वारसा समर्थपणे सुरू ठवल्याबद्दल साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांचा शिर्डीतील सर्वपक्षीय ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. शिर्डी ग्रामस्थांनी संस्थानचे साईबाबा सुपर स्पेशालिटी रूग्णालयात कोविड ऐवजी इतर रुग्णांवर उपचार करण्याची केलेली मागणी मान्य करण्यात आली असल्याची माहीती शिवसेनेचे नेते कमलाकर कोते यांनी दिली. कोविड संकटाच्या काळात साईबाबा संस्थानच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात आल्या त्याचा लाभ हज़ारों गोरगरीब रूग्णांना झाला. साईबाबा सुपर रूग्णालय, साईनाथ रूग्णालय आणी कोविड सेंटर आदी ठिकाणी कोविड रूग्णांसाठी लागणा-या उच्चतम सुविधा उपलब्ध करून दिल्याने त्याचा लाभ कोरोना रूग्णांना मोठ्या प्रमानावर झाला. कोरोनाच्या दुस-या लाटेचा सामना करत असताना राज्यात ऑक्शीजनचा मोठ्या प्रमानावर तुटवडा जाणवू लागताच साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी साईभक्त असलेल्या अंबानी आणी रमनी यांचेशी संपर्क साधुन त्यांनी दिलेल्या दानातून भव्य अशी ऑक्शीजन प्लँन्ट आणी अत्याधुनिक आरटीपीसीआर लँबची निर्मीती केली. बगाटे यांच्या या कार्याचे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले. शिर्डीत काही तथाकथित लोकांकडून सध्या शिर्डीसह होत असलेली बदनामी तसेच साईबाबा संस्थान आणी संस्थानच्या रूग्णालयांना चुकीच्या पध्दतीने बदनाम करण्यात येत असल्याच्या पाश्वभुमीवर प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते, कमलाकर कोते, अभय शेळके, सुजीत गोंदकर, ज्ञानेश्वर गोंदकर, सुधाकर शिंदे, रमेश गोंदकर, बाबासाहेब कोते, महेंद्र शेळके, नितीन कोते, विजय जगताप, संजय शिंदे, अशोक कोते, सचिन कोते, संदीप सोनवने, मंगेश त्रिभुवन, संदिप पारख आदी सर्वपक्षीय प्रमुख पादाधिका-यांची बैठ्ठक झाली. या सर्वपक्षीय बैठ्ठकीत शिर्डीतील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. साईबाबा संस्थानच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी कोरोनाच्या संकट काळात केलेल्या कामाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठींबा दिला. त्यानंतर या सर्वपक्षीय नेत्यांनी बगाटे यांच्या कार्यलयात जावून त्यांचा सत्कार करून त्यांच्या कामाला पाठींबा दिला. यावेळी राज्यातील गोरगरीब रूग्णांना वरदान ठरलेल्या साईबाबा सुपर हॉस्पिटल मधील कोविड रूग्णांना कोविड सेंटर मध्ये हलवून या सुपर हॉस्पिटलमध्ये पुर्वीप्रमानेच रूग्णांवर उपचार सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी बगाटे यांनी मान्य केली. शिर्डी ग्रामस्थांनी आजवर चांगल्या कामाला पाठींबा देण्याचीच भुमिका बजावलेली असुन यापुढेही ती कायम ठेवली जाणार असल्याचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते व अभय शेळके यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगीतले.

No comments:

Post a Comment