मनपाच्या सर्व १७ प्रभागांमध्ये लसीकरण केंद्र सुरु करावे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, May 21, 2021

मनपाच्या सर्व १७ प्रभागांमध्ये लसीकरण केंद्र सुरु करावे

 मनपाच्या सर्व १७ प्रभागांमध्ये लसीकरण केंद्र सुरु करावे

बालरोग तज्ञांची टास्क फोर्स कमिटी स्थापन करावी- मनपा आरोग्य समितीची आयुक्तांकडे मागणी



नगरी दवंडी

अहमदनगर प्रतिनिधी- कोरांना संसर्ग विषाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना,त्यावर विविध उपाययोजना करणे गरजेचे आहे. कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी लसीकरणाला महत्त्व देणे गरजेचे आहे.यासाठी आ.संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व १७ प्रभागांमध्ये लसीकरण केंद्रे सुरू करावी तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मानवी जीवनावर विपरीत परिणाम झाला आहे.या कोरोना संकट काळामध्ये नागरिक भयभीत झाले आहेत. काही कोरोना रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला आहे,यापुढील काळामध्ये कोरोना रुग्णांवर व्यवस्थित उपचार होण्यासाठी उपाययोजनाची खरी गरज आहे. तज्ञांच्या मते लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती जास्त आहे. थोड्या प्रमाणात का होईना बाल कोरोना रुग्ण आढळत आहे,यासाठी बालरोग तज्ञ डॉक्टरांची टास्क फोर्स कमिटी स्थापन करावी जेणेकरून बालकांवर उपचार घेणे सोपे जाईन,अशी मागणी आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे मनपा आरोग्य समितीच्या वतीने करताना अध्यक्ष डॉ. सागर बोरुडे, सदस्य संजय ढोणे, सदस्य सचिन जाधव, सदस्य सतीश शिंदे व अजय चितळे यांनी केली.

       नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात म्युकर मायकोसीसचे रुग्ण आढळत आहे. दुर्दैवी काही जणांचा मृत्यू देखील झाला आहे या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक असलेले Amphotreicin-B हे इंजेक्शन बाजारामध्ये उपलब्ध होत नाही तसेच काळ्या बाजारातून मोठी किंमत रुग्णांच्या नातेवाइकांना मोजावी लागते यासाठी महापालिकेच्या वतीने तात्काळ उपाययोजना करण्यात यावा तसेच ॲम्ब्युलन्स चालकांकडून मनमानी पद्धतीने रुग्णांची लूट केली जाते यावर उपाययोजना कराव्यात व RTPCR तपासणीचा रिपोर्ट चोवीस तासाच्या आत देण्यात यावा,काही लॅब कडून वेळेवर रिपोर्ट दिला जात नसल्याने कोरोनाबाधि रुग्णांकडून संसर्ग होण्याची भीती निर्माण होऊ शकते, नागरिकांमध्ये कोरोनाची जनजागृती करण्यासाठी घंटा गाड्यांवर ध्वनिफीत लावण्यात यावी अशा मागण्या मनपा आरोग्य समितीच्या वतीने करण्यात आल्या.

No comments:

Post a Comment