चांदा येथील कोवीड सेंटरमध्ये शिक्षिकेने भावगीत भक्तिगीते गाऊन रुग्णांचे वाढविले मनोधैर्य - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 29, 2021

चांदा येथील कोवीड सेंटरमध्ये शिक्षिकेने भावगीत भक्तिगीते गाऊन रुग्णांचे वाढविले मनोधैर्य

 चांदा येथील कोवीड सेंटरमध्ये शिक्षिकेने भावगीत भक्तिगीते गाऊन रुग्णांचे वाढविले मनोधैर्य


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः नेवासा- नेवासा तालुक्यातील चांदा येथील सोमेश्वर कोविड सेंटरमध्ये भावगीते व भक्तिगीते गाऊन नेवासा येथील गंगानगर जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिका सौ.सुप्रिया सुरेश झिंजुर्डे यांनी कोविड रुग्णांचे मनोधैर्य व मनोबल वाढविण्यासाठी सेवा दिली. यावेळी आनंद देणारी गीतांसह त्यांनी स्वरचित केलेल्या कवितांचे ही यावेळी सादरीकरण केले.
   चांदा येथील शांताताई मरकड यांच्या पुढाकाराने या  कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. नुकत्याच डिजीटल समूह महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राजपुत प्रकाश सिंग यांनी आयोजित मराठी भाषा दिनानिमित्त  राज्यस्तरीय कविता गायन स्पर्धेत सौ.सुप्रिया झिंजुर्डे यांचा प्रथम क्रमांक आला होता त्यांना मिळालेल्या  रक्कमेतुन यावेळी रुग्णांसाठी अल्पोपहार देण्यात आला.
कोवीड सेंटरचे डॉक्टर व चांदा येथील तरुण वर्गांनी  सहकार्य करून या रुग्णांसाठी काही क्षण मनोरंजनासाठी दिल्याबद्दल सौ.शांताताई मरकड व सौ. सुप्रिया झिंजुर्डे तसेच डॉ.सुरेश झिंजुर्डे यांचेही आभार मानले.मनोरंजनातून मोलाची सेवा या कोवीड सेंटरला दिल्याने काही काळ या कोवीड सेंटरचे वातावरण उत्साहवर्धक बनले होते.रुग्णांच्या मनाला विरंगुळा व  दिलासा मिळाला असल्याने त्यांचे मनोबल मनोधैर्य वाढण्यासाठी मोठी मदत झाली असल्याचे संयोजकांनी सांगितले.

No comments:

Post a Comment