भगवान बुद्धांच्या विचाराने समाजाचा उद्धार होईल ः किशोर बुद्ध - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 29, 2021

भगवान बुद्धांच्या विचाराने समाजाचा उद्धार होईल ः किशोर बुद्ध

 भगवान बुद्धांच्या विचाराने समाजाचा उद्धार होईल ः किशोर बुद्ध

बौद्ध संस्कार संघाच्या ऑनलाईन स्पर्धेचा निकाल जाहीर


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः भगवान गौतम बुद्धांनी जगाला अमुल्य विचार दिले आहेत. त्याच्या विचारांवर काळानुरुप अनेक राज्यकर्त्यांनी राज्य केले आणि जनतेला सुखी-समृद्ध केले. बौद्ध तत्वज्ञान हे समाजासाठी नेहमीची मार्गदर्शक ठरले आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला  ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हा एकमेव ग्रंथ बुद्ध वचन आहे, असेच मानले जाते. सर्वांनी एकत्र येवून कार्य करावे, यामुळे समाजाचा उद्धार होईल. याचा अभ्यास करुन खर्या बुद्ध तत्वाची ओळख  होईल. बौद्ध संस्कार संघाच्यावतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमांमुळे नवीन पिढीपर्यंत भगवान बुद्धांचे विचार पोहचणार आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय आचार्य इंजि.किशोर बुद्ध यांनी केले.

बौद्ध संस्कार संघाच्यावतीने बौद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात ऑनलाईन साजरी करण्यात आली. या निमित्त घेण्यात आलेल्या धम्मज्ञान परिक्षेचा निकाला जाहीर करुन यशस्वीतांना ऑनलाईन सन्मानपत्राचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाास प्रमुख अतिथी इंद्रजित फुलझेले, मानके सर उपस्थित होते. यावेळी अशोक पाटील यांनी विशेष मार्गर्शन केले.
दि. 15 ते 25 मे दरम्यान ऑनलाईन जमा करण्यात आलेल्या उत्तरपत्रिकेतून निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये रावसाहेब जगताप (मुंबई),  प्रदीप इंगळे (नांदेड), विनायक रामटेके (चंद्रपुर), अशोक तेलगोटे (अकोला), विजय फुलझेले (यवतमाळ), बबन माने (सातारा), मीराबाई वाघमारे (अमरावती), रावसाहेब खंडागळे (जालना), सुरेखा फले, व्ही.जी.इंगळे (पुणे), तसेच नगर जिल्ह्यातील बाबासाहेब पगारे (कोपरगांव), रघुनाथ भालेराव (संगमनेर), बाळासाहेब धस (शेवगाव), भिमा घोडके (जामखेड), प्रशांत चव्हाण , गोविंद शिंदे (श्रीगोंदा), राजेंद्र अवचर (कर्जत), किरण सोनवणे (पारनेर), शिरिष गायकवाड (राहुरी), प्रशांत साळवे, राहुल शिंदे, सचिन डहाणे (नगर) आदिंनी यशस्वीतांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
प्रास्तविका भाऊसाहेब देठे म्हणाले, बौद्ध संस्कार संघाच्यावतीने नेहमीच विविध उपक्रमांतून समाजोन्नत्तीचे काम केले आहे. समाजात घडणार्या चांगल्या-वाईट घटनांचा विचार करुन संघाच्यावतीने उपक्रम राबविले जातात. सध्याच्या कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत समाजातील दानशुरांच्या मदतीने गरजू कुटूंबियांना किरणा व इतरही मदत करण्यात आली. बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या माध्यमातून  भगवान बुद्धांचे विचार सर्वांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. स्पर्धेस मिळालेला प्रतिसाद पाहता समाजामधील जागृकता वाढत आहे, ही फलश्रुती असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे संयोजन मानसी देठे यांनी केले. त्रिसरण पंचशिल प्रतिभा देठे यांनी घेतले, प्रितम मेस्त्राम यांनी तांत्रिक यंत्रणा सांभाळली. अभिजित शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment