अभय आव्हाड प्रतिष्ठानकडून वंचित घटकांना किराणा वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, May 10, 2021

अभय आव्हाड प्रतिष्ठानकडून वंचित घटकांना किराणा वाटप

 अभय आव्हाड प्रतिष्ठानकडून वंचित घटकांना किराणा वाटप 



नगरी दवंडी

खरवंडी कासार / प्रतिनिधी 

महाराष्ट्र शासनाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव लक्षात घेता गेल्या महिनाभरा पासून संपूर्ण राज्यात लॉकडाऊन सुरु केले आहे. सदर लॉकडाउन नंतरही कोरोनाग्रस्तांची संख्या आटोक्यात येताना दिसत नसून हा लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत शासनाकडून मिळत आहेत. अशा वेळी अनेक उद्योगधंदे व कामही बंद पडल्यामुळे मजूर, कामगार, रोज हातावर पोट भरणारे अनेक कुटुंब घरातच बसून आहेत. त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आल्याने येथील अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठान कडून उपनगरातील मेहेरटेकडी, फुलेनगर, बाजारतळ, भिकन वाडा आदी परिसरातील 200 कुटुंबाना महिनाभर पुरेल इतका किराणा व जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. 

गरीब मजूर व हातावर पोट असलेल्या कुटुंबाना जीबनावश्यक वस्तू  दिल्याने त्यांना आता लॉकडाऊन च्या काळात घराबाहेर पडण्याची गरज भासणार नाही. परिणामी कोरोनाची साखळी तोडण्यास यामुळे मदतच होईल. अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे नागरिक व वंचित घटकांकडून स्वागत होत आहे. 

यावेळी नगरसेवक प्रसाद आव्हाड, मुरलीधर डोईफोडे, तात्या बिडकर, संजय बडे, सतीश डोळे, मनोज ढाकणे, अभिजित खेडकर  उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here