शिवसेनेचे मुकुंद सिनगर यांच्या हस्ते साईआश्रय अनाथाश्रमात फळे वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, May 31, 2021

शिवसेनेचे मुकुंद सिनगर यांच्या हस्ते साईआश्रय अनाथाश्रमात फळे वाटप

 शिवसेनेचे मुकुंद सिनगर यांच्या हस्ते साईआश्रय अनाथाश्रमात फळे वाटप


शिर्डी ः
कै.मुकेश सातपुते या एका तरुण आणि उमद्या शिवसैनिकाचे अकाली जाण्याने सातपुते कुटुंबासह संपूर्ण आशवी गटासह राहाता आणि संगमनेर तालुक्यातील सामान्य शिवसैनिकांचे मोठे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे युवा नेते मुकुंद सिनगर यांनी दिली. नुकतेच शिर्डीतील साईआश्रया अनाथाश्रमात फळे वाटप करून सामाजिक जाणिवेतून कै. मुकेश भाऊंना श्रद्धांजली वाहताना उपस्थित सर्वजण भावुक झाले होते.यावेळी त्यांचे बंधू संगमनेर तालुका शिवसेनेचे गणेश सातपुते सर यांच्यासह राहाता तालुका शिवसेनेचे मिनिनाथ शिंदे, रिंकेश जाधव, विकास सुरासे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचे खासदार आदरणीय सदाशिव लोखंडे साहेब यांनी शोकसंदेश पाठवत सातपुते कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या. कै. मुकेश भाऊंचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या 29 व्या वर्षी अकाली दुःखत निधन झाल्याने त्यांच्या परिवारावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला असताना त्यांचे बंधू गणेश यांना नेहमीच सामाजिक कार्याची आवड असल्याने कै. मुकेश यांचा पहिला महिना अनाथ मुलांना फळे वाटून करण्याचा धाडसी निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला. खर्‍या अर्थाने माणूस गेल्यानंतर त्याच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी सामाजिक जाणिवेतून सातपुते कुटुंबाने आजची केलेली सेवा समाजाला नक्कीच प्रेरणादायी असल्याचे मत युवानेते मुकुंद सिनगर यांनी व्यक्त केले. श्री साईबाबांनी आपल्या हयातीत संपूर्ण मानव जातीची निस्वार्थ सेवा केली, याच विचाराने प्रेरित होऊन साईआश्रया परिवाराचे चालक श्री.गणेश दळवी अतिशय कष्टातून एकूण 125 मुले आणि 25 वृद्धांसह परिवाराचे पालनपोषण करत आहेत

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here