चुलत्यांच्या मृत्यूचे दुःख पोटात घालून कोरोना योद्धा पुन्हा मैदानात ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, May 20, 2021

चुलत्यांच्या मृत्यूचे दुःख पोटात घालून कोरोना योद्धा पुन्हा मैदानात !

 चुलत्यांच्या मृत्यूचे दुःख पोटात घालून कोरोना योद्धा पुन्हा मैदानात !

आ. लंके यांचे चुलते बाळासाहेब लंके यांचे निधन : विधी उरकून आ. लंके कोव्हीड सेंटरमध्ये दाखल



नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी -  

आमदार नीलेश लंके यांचे चुलते बाळासाहेब लंके यांचे बुधवारी रात्री निधन झाले. रात्री अंत्यसंस्कार उरकून आ. लंके हे रात्रीच बारा वाजण्याच्या सुमारास भाळवणी येथील कोव्हिड सेंटरला दाखल झाले होते. सख्ख्या चुलत्याच्या निधनामुळे झालेले दुःख पोटात घालून रूग्णांच्या सेवेत दाखल झालेल्या आ. लंके या सामाजिक बांधिलकीचे कौतूक होत आहे.

  गेल्या महिनाभरापासून आ. लंके यांचे चुलते बाळासाहेब लंके हे कोरोनाची बाधा झाल्याने नगर शहरातील खाजगी रूग्णालयात उपचार घेत होते. पुढील पाच दिवसांत त्यांना रूग्णालयातून सोडण्यात येेईल असेही डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र फुफूस निकामी झाल्याने बुधवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमरास त्यांचे निधन झाले.  रात्रीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर आ. लंके यांनी रात्री बारा वाजता भाळवणी येथील कोव्हिड सेंटरमध्ये दाखल होत रूग्णांची विचारपूस केली. आरोग्य यंत्रणेशी संवाद साधून रूग्णांवर करण्यात आलेल्या उपचारांचीही माहीती घेतली. गुरूवारी सकाळी सावडण्याचा विधी झाल्यानंतर आ. लंके पुन्हा जनतेच्या सेवेत दाखल झाले.

 बाळासाहेब लंके यांची प्रकृती खालवल्याने बुधवारी मुंबई येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत पाण्याच्या विविध योजनेसंदर्भातील बैठकीस ते उपस्थित राहू शकले नव्हते. गुरूवारी दुपारी आ. लंके यांनी मंत्री पाटील यांच्यासमवेत झालेल्या झुम मिटींगमध्ये सहभागी झाले. मतदार संघातील विविध योजनांसदर्भातील निर्णय या बैठकीत झाल्याचे आ. लंके यांनी सांगितले.

मंत्री पाटील यांच्यासोबतच्या बैठकीनंतर आ. लंके हे पुन्हा भाळवणी येथील कोव्हिड सेंटरमध्ये दाखल झाले. रूग्णांची विचारपूस, त्यांच्या प्राणवायूच्या पातळीची तपासणी, भेट देण्यासाठी आलेल्या नागरीकांशी संवाद असा त्यांचा नित्याचा दिनक्रम सुरू झाला.

चुतत्यांच्या मृत्यूचे दुःख आहेच, मात्र कोव्हिड सेंटरमध्ये कोरोनाशी लढा देणाऱ्या मायबाप जनतेकडे दुर्लक्ष करून कसे चालेल ? ही जनता हेच माझे कुटूंब आहे. या कुटूंबाची काळजी घेणे कुटूंबप्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे असे आ. लंके यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

फोटो ओळ 

भाळवणी : चुलत्यांचे अंत्यसंस्कार होताच आ. नीलेश लंके हे भाळवणी येथील कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णसेवेत दाखल झाले.

No comments:

Post a Comment