दहिगाव येथे पार पडले कोरोना तपासणी शिबिर
प्रांताधिकाऱ्यांनी केली प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी, गैरहजर कर्मचाऱ्यांची घेतली झाडाझडती
नगरी दवंडी / प्रतिनिधी
नगर तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन उपसभापती रविंद्र भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि. 20) श्रीराम मंदिर येथे रिपिड ॲटिजन टेस्ट तसेच आरटीपी सिआर तपासणी कँपचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकुण ८० व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यांत ४ व्यक्ती कोरोना बांधीत आढळून आल्या. यात
दशमीगव्हाण २, साकत१, वाळुंज १, येथील बधितांचा समावेश असून रुग्णांना वाळुंज येथील कोवीड सेंटरला पाठवण्यात आले. दरम्यान नगर विभागाचे उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी प्रत्यक्ष भेट देऊन प्रशासकीय यंत्रणाचे अधिकारी कर्मचारी काम व्यवस्थितपणे पार पाडतात की नाही याची खातरजमा केली. तसेच अडचणी समजून घेतल्या. यावेळी गैरहजर कर्मचाऱ्यांचे अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थितीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे. यावेळी सरपंच मधुकर म्हस्के, सुनील म्हस्के, यासह रुईछत्तीसी वैद्यकीय अधिकारी सविता ससाणे, डाॅ.हिवाळे, परिचारिका कसबे, सोमनाथ जाधव,के.आर उगले,बी.षी जाधव,अंगणवाडी सेविका कमल जरे,आशा सेविका आशा जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी पाराजी माने,आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment