सुवर्णमध्य साधावा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, May 27, 2021

सुवर्णमध्य साधावा

 सुवर्णमध्य साधावा

राज्यातील लॉक डाऊन 31 मे ला  संपणार असून 1 जून पासून लॉक डाऊनमध्ये शिथिलता मिळते की लॉक डाऊन आणखी वाढवला जातो याकडे व्यापार्‍यांसह राज्यातील सर्वसामान्य नागरिकांचेही लक्ष लागले आहे. राज्यात दुसरी लाट वेगाने पसरत आहे असे दिसताच राज्य सरकारने लॉक डाऊनची घोषणा केली. राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या थोपवण्यासाठी राज्य सरकारने लॉक डाऊनचा निर्णय घेतला. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉक डाऊन आवश्यकही होते. सरकारने लॉक डाऊन जाहीर केल्यावर व्यापार्‍यांसह राज्यातील सर्वसामान्य नागरिकांनीही त्याचे स्वागतच केली. लॉक डाऊनमुळेच कोरोनाची दुसरी लाट ओसरली. लॉक डाऊन केल्यामुळेच राज्यातील कोरोना  रुग्णांची संख्या कमी झाली हे मान्यच करावे लागेल लॉक डाऊन नसते तर कोरोना आवाक्याबाहेर गेला असता पण आता  कोरोना आवाक्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे त्यामुळे राज्य सरकारने लॉक डाऊन आता शिथिल करावा अशी मागणी होऊ लागली आहे. यापूर्वी तीनदा लॉक डाऊनला मुदतवाढ देण्यात आली होती आता  लॉक डाऊनला पुन्हा मुदतवाढ न देता परिस्थितीचा आढावा घेऊन सरकारने निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे .लॉक डाऊनचे दुष्परिणाम काय होतात हे नव्याने सांगण्याचे कारण नाही आपण ते मागील वर्षी अनुभवले आहे. मागील वर्षीचा लॉक डाऊनचा अनुभव अतिशय भयानक होता. लॉक डाऊनमुळे हजारो तरुणांचे रोजगार गेले, शेकडो कुटुंबे रस्त्यावर आली, मध्यमवर्गीयांचे आर्थिक नियोजन कोलमडले, व्यापारी व व्यावसायिकांपुढे मोठे संकट उभे राहिले, अर्थ चक्र थांबले त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला, मोलमजुरी करणार्‍यांची तर अक्षरशः उपासमार झाली एकूणच लॉक डाऊनचे खप दुष्परिणाम झाले त्याची पुनरावृत्ती होऊ द्यायचे नसेल तर आतापासूनच नियोजन करावे लागेल  ज्या भागात रुग्ण  संख्या जास्त आहे त्या भागातील निर्बंध कायम ठेवून ज्या भागात कमी रुग्णसंख्या आहे त्या भागातील निर्बंध शिथिल करता येईल करता येऊ शकेल. मंदिरे, सार्वजनिक बागा, लग्न समारंभ, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रम यासारख्या कार्यक्रमावरील बंदी कायम ठेवून बाकीचे व्यवहार सुरू केल्यास अर्थचक्रास गती मिळेल. अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी लोकलही सुरू करावी. जनतेनेही लॉक डाऊन शिथिल केल्यास त्याचा गैरफायदा न घेता कोरोना नियमांचे पालन करावे. मागील वर्षी लॉक डाऊन हटवल्यावर नागरिकांनी कोरोना गेला असे समजून  जो मुक्त विहार केला त्याच्यामुळेच कोरोनाची दुसरी लाट आली आता  तिसरी लाट येऊ न देण्याची जबाबदारी जितकी सरकारची आहे तितकीच नागरिकांचीही आहे नागरिकांनी जबाबदारीचे पालन करून सरकारने दिलेल्या नियमांचे पालन केल्यास कोरोनाला रोखता येऊ  शकेल तसेच  जनजीवन पूर्वपदावर येऊ शकेल.
- श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
मो. 9922546295

No comments:

Post a Comment