कोळगाव येथील कोविड सेंटरला औषधांची भेट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 17, 2021

कोळगाव येथील कोविड सेंटरला औषधांची भेट

 कोळगाव येथील कोविड सेंटरला औषधांची भेट


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः कोळगाव येथील -ऊउउ बँकेचे शाखा व्यवस्थापक राजेंद्र शिंदे यांनी कोळगाव येथील कर्मवीर भाऊराव पाटील कोविड केअर सेंटरला औषध भेट दिली. ही औषधे नागवडे कारखान्याचे संचालक माजी सरपंच हेमंत नलगे यांच्याकडे सुपूर्त केली. यावेळी माजी सभापती पुरुषोत्तम लगड, कोविड केअर सेंटरचे डॉ. ऋषिकेश नलगे, डॉ.वैशाली धस, मनोज मचाले, राजेंद्र लगड, आदींसह आरोग्य सेवक व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजेंद्र शिंदे म्हणाले की कोळगाव येथील कर्मवीर भाऊराव पाटील कोविड केअर सेंटर मध्ये 35 ते 40 रुग्ण उपचार घेत आहेत . या कोविड सेंटरमध्ये औषधांची कमतरता भासत असताना सामाजिक भावनेने मदत देण्यात आली आहे. माजी सरपंच हेमंत नलगे, माजी सभापती पुरुषोत्तम लगड यांच्यासह अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

No comments:

Post a Comment