35 वर्षीय तरुणाची कोरोनावर यशस्वी मात - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 17, 2021

35 वर्षीय तरुणाची कोरोनावर यशस्वी मात

 35 वर्षीय तरुणाची कोरोनावर यशस्वी मात


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः कोळगाव ग्रामपंचायत कर्मचारी प्रवीण कर्पे या 35 वर्षीय तरुणाने अवघ्या 10 दिवसात कोरोणावर मात केली. रविवारी संध्याकाळी कर्मवीर भाऊराव पाटील कोविड केअर सेंटर मधून डिस्चार्ज देण्यात आला.यावेळी कोविड सेंटरच्या डॉक्टर डॉ. राजेश कांडेकर, डॉ. ऋषिकेश नलगे, डॉ. वैष्णवी धस तसेच कर्मचार्‍यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे कौतुक केले. यावेळी नागवडे साखर कारखान्याचे संचालक माजी सरपंच हेमंत नलगे, माजी सभापती पुरुषोत्तम लगड उपस्थीत होते.
              कोळगाव ग्रामपंचायत कर्मचारी प्रवीण कर्पे या 35 वर्षीय तरुणाचा 10 दिवसांपूर्वी कोरोना आरटीपीसीआर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता . त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता . तपासण्या केल्यानंतर त्यांचा एचआरसीटी स्कोर हा 12 वर पोहोचला. त्याला कोळगाव येथील कर्मवीर भाऊराव पाटील कोविड केअर सेंटर मध्ये दाखल करण्यात आले. येथे उपचार करणार्‍या डॉ. राजेश कांडेकर, डॉ.ऋषिकेश नलगे, डॉ. वैष्णवी धस यांनी अथक परिश्रमानंतर व योग्य उपचारांनी व त्यांच्या इच्छाशक्तीमुळे प्रवीण याने कोरोनावर मात केल्याचे नागवडे कारखान्याचे संचालक माजी सरपंच हेमंत नलगे यांनी सांगितले . डॉक्टरांच्या पूर्ण प्रयत्नांनी कोरोनावर यशस्वी उपचार तसेच येथील कर्मचारी राजेश उजगरे, राजेंद्र लगड, सुनीता उजगरे, मनोज मचाले, सचिन चंदन यांच्या धीर देण्याने कर्मवीर भाऊराव पाटील कोविड केअर सेंटर मध्ये रूग्ण बरे होत असल्याची प्रतिक्रिया प्रवीण कर्पे याने दिली. कोविड सेंटर मधून डिस्चार्ज देताना पुष्पगुच्छ देत प्रवीण याचे कौतुक केले. यावेळी नागवडे साखर कारखान्याचे संचालक माजी सरपंच हेमंत नलगे, माजी सभापती पुरुषोत्तम लगड यांच्या बरोबर अनेक मान्यवर उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment