‘आम्ही लढलो-आम्ही घडलो’ या ग्रंथावर परिसंवादातील सूर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 17, 2021

‘आम्ही लढलो-आम्ही घडलो’ या ग्रंथावर परिसंवादातील सूर

 ‘आम्ही लढलो-आम्ही घडलो’ या ग्रंथावर परिसंवादातील सूर

इतिहास घडवणार्‍यांनी लिहिले पाहिजे

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः‘आम्ही लढलो-आम्ही घडलो’ न्यायासाठी, हक्कांसाठी, नव्या समाजाच्या निर्मितीसाठी.... या प्रा. डॉ. मारोती तेगमपुरे व प्रा. डॉ. अतुलकुमार चौरपगार यांनी संपादित केलेल्या चळवळीतील स्वकथनावर आधारित ग्रंथावर दि. 16. 05. 2021 रोजी परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. परीसंवादाच्या सुरवातीला महाराष्ट्रात एस.एफ.आय. विद्यार्थी संघटनेची ज्यांनी मुहुर्तमेढ ठेवून चळवळीची सुरुवात केली असे प्राचार्य डॉ. विठ्ठल मोरे, कॉ. अ‍ॅड. उध्दव भवलकर, काँग्रेसचे राजीव सातव व इतर कोरोना महामारीत मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली .
या परिसंवादामध्ये प्रा. डॉ. प्रतिभा अहिरे, व्यवस्थापन परिषद सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांनी विद्यार्थी चळवळ जेवढी महत्वाची तेवढेच कार्यकर्त्यांना जपणेही महत्वाचे आहे असे मत व्यक्त केले. प्रा. डॉ. महेबूब सय्यद, ज्येष्ठ साहित्यिक, अहमदनगर यांनी स्वकथन लिहितांनी सामान्य वाचकांपर्यंत पोहचने व त्यांचे मनपरिवर्तन करने महत्वाचे असते असे मत व्यक्त केले. श्री. आलोक देशपांडे, प्रिंन्सिपल कॉरस्पाँडेंट, द हिंदू यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला, आज भविष्याकडे बघतांना हे पुस्तक एक सांस्कृतिक ठेवा राहील जे नेहमी चळवळींसमोर आदर्श राहील. सहभागी अभ्यासकांनी ‘आम्ही लढलो-आम्ही घडलो’ या पुस्तकाबद्द्ल बोलतांना पुस्तकांमधील लेखकांच्या स्वकथनांवर भाष्य केले व भविष्यामध्ये सर्वसमावेशक चळवळ करतांना हा पुस्तकरूपी ठेवा खुप महत्वाचा ठरणार आहे, याबद्द्ल सर्व लेखकांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉ. अण्णा सावंत यांनी हे पुस्तक म्हणजे सामाजिक चळवळीचे संहिताकरण कशा प्रकारे केले पाहिजे, याचा एक आदर्श वस्तुपाठ व इतरांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे जेणेकरुन असा उपक्रम आपआपल्या भागातील चळवळींचा लेखाजोखा भविष्यात करतील असे मत व्यक्त केले.

No comments:

Post a Comment