प्राथमिक आरोग्यकेंद्रातून चांगली सेवा मिळावी ः तनपुरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 29, 2021

प्राथमिक आरोग्यकेंद्रातून चांगली सेवा मिळावी ः तनपुरे

 प्राथमिक आरोग्यकेंद्रातून चांगली सेवा मिळावी ः तनपुरे

14 व्या वित्त आयोगातून राहुरी तालुक्याला 6 रुग्णवाहिका देण्यात आल्या होत्या. राहुरीतील लोकार्पण सोहळ्यात पूर्वीच उंबरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एका रुग्णवाहिकेचे लोकार्पण थाटात संपन्न झाले , त्यामुळे जिल्हा परिषदेच्या उंबरे गण व वांबोरी गटातील राजकीय चर्चा यावेळी उपस्थितांमध्ये चर्चिली जात होती.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः
शासनाच्या 14 व्या वित्त आयोगाच्या पैशाच्या व्याजातून राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी 45 रुग्णवाहिका मंजूर केल्या , त्यातील रुग्णवाहिका राहुरी तालुक्याला मिळाल्या . यापुढील काळात प्राथमिक आरोग्य केंद्रातून तालुक्यातील रुग्णांना चांगल्या प्रकारे सेवा मिळावी, असे आवाहन राज्यमंत्री मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले .
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना शासन अनुदानातून प्राप्त रुग्णवाहिका लोकार्पण ना. तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले . राहुरी पंचायत समितीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते . आरोग्य सुविधा मिळण्यासाठी रुग्णवाहिकांची कायम गरज असते .
तालुक्यातील आरोग्यसेवा जलद होण्यासाठी रुग्णवाहिकांची मदत होईल असे तेम्हणाले . रुग्णसंख्या कमी होत आहे ,तालुक्यातील प्रशासन पदाधिकारी वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या मेहनतीतून रुग्णसंख्या लवकरच शून्यावर यावी , असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रुग्णसंख्या कमी झाल्यास 1 जूननंतर मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने कमी होण्याची आशा त्यांनी व्यक्त केली . यावेळी पंचायत समितीच्या सभापती सौ . बेबीताई सोडनर , मराठा महासंघाचे संभाजी दहातोंडे , सुरेश निमसे , सौ . मनीषा ओहोळ , आरोग्य अधिकारी डॉ. दिपाली गायकवाड , प्रदीप पवार, बाळासाहेब सोडनर , डॉ. दिपाली गायकवाड, किरण खेसम्हाळसकर, राहुल खळेकर, जयवंत गवते ,राहुल कोतकर ,घनश्याम कळसाईत, किरण शिंदे श्रीम. तेहसिन खान ,श्रीम. हर्षदा पेरणे, श्रीम. स्वाती बिल्ला तसेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील डॉ. वृषाली कोरडे,डॉ. किर्ती कोरडकर, डॉ. अविनाश जाधव, डॉ. मल्हारी कौतुके, डॉ. आणासाहेब मासाळ, डॉ. गणेश आडभाई हे प्राथामिक आरोग्य केंद्रातीलआदी मान्यवर उपस्थित होते . सूत्रसंचालन रवींद्र आढाव यांनी केले तर आभार बाळासाहेब लटके यांनी मानले.

No comments:

Post a Comment