डॉ श्रीकांत पठारे यांच्या बालरोगविभाग कोव्हीड सेंटरला सभापती गणेश शेळकेंकडून ३० बेड व ५० ब्रास फरशी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 29, 2021

डॉ श्रीकांत पठारे यांच्या बालरोगविभाग कोव्हीड सेंटरला सभापती गणेश शेळकेंकडून ३० बेड व ५० ब्रास फरशी

 डॉ श्रीकांत पठारे यांच्या बालरोगविभाग कोव्हीड सेंटरला सभापती गणेश शेळकेंकडून ३० बेड व ५० ब्रास फरशी



नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

पारनेर तालुक्यात सुरू होत डॉ श्रीकांत पठारे संचलित  बालरोग विभाग कोव्हीड सेंटरच्या कामाला सुरुवात झाली असून पारनेर पंचायत समिती सभापती गणेश शेळके यांच्याकडून कोव्हीड सेंटरसाठी ३० बेड व ५० ब्रास फरशी भेट देण्यात आली. 

      कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना बचावासाठी डॉ श्रीकांत पठारे हे पारनेरमध्ये ५० बेडचे ऑक्सिजनयुक्त कोव्हीड सेंटर उभारत आहे. लहान मुलांसाठी बालरोग विभाग कोव्हीड सेंटर हे राज्यातील पाहिले कोव्हीड सेंटर पारनेरमध्ये उभे राहत आहे. यापूर्वी डॉ श्रीकांत पठारे यांनी पूर्णवाद भवन येथे ग्रामीण रुग्णालय डेडिकेटेड कोव्हीड सेंटर सुरू केले होते. खासगी डॉक्टर कोव्हीड सेंटर उभारून रुग्णांना मोफत उपचार देणारे राज्यातील एकमेव डॉक्टर म्हणून डॉ श्रीकांत पठारे यांचा सन्मान महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व खासदार सुजय विखे यांनी केला होता. आता सध्या पूर्णवाद भवन येथे कोव्हीड सेंटर सुरू असताना लहान मुलांसाठी बालरोग विभाग कोव्हीड सेंटर डॉ श्रीकांत पठारे पारनेरमध्ये उभारत आहे. त्याची जोरदार तयारी सुरू असून या कोव्हीड सेंटरसाठी पारनेर पंचायत समिती सभापती गणेश शेळके यांच्याकडून ३० बेड व ५० ब्रास फरशी भेट देण्यात आली. 

डॉ श्रीकांत पठारे यांनी सुरू केलेल्या कोव्हीड सेंटरला मदतीसाठी तालुकभरातून मदतीचे हात पुढे सरसावले आहेत. त्यांच्या या सामाजिक कामाबद्दल राज्यभरातून डॉ श्रीकांत पठारे यांचे कौतुक केले जात आहे.

No comments:

Post a Comment