ऐतिहासिक वारसा हे नगर शहराचे वैभव ः आ. जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 29, 2021

ऐतिहासिक वारसा हे नगर शहराचे वैभव ः आ. जगताप

 ऐतिहासिक वारसा हे नगर शहराचे वैभव ः आ. जगताप

शहर स्थापना दिनानिमित्त अरुणकाका जगतापांना स्नेहबंधतर्फे रणगाड्याची प्रतिमा भेट


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः 531 वर्षांचा कालखंडाचा वैभवशाली इतिहास असलेल्या अहमदनगर शहराला गतवैभव प्राप्त करुन देणे ही प्रत्येक नगरकरांची जबाबदारी आहे. लाभलेला ऐतिहासिक वारसा हे या शहराचे वैभव आहे. हा वारसा भविष्यात नवी दिशा देणारा ठरु शकतो, असे प्रतिपादन आमदार अरुणकाका जगताप यांनी केले.
अहमदनगर शहराच्या 531व्या स्थापना दिनानिमित्त स्नेहबंध सोशल फौंडेशन च्या वतीने अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी आमदार अरुणकाका जगताप यांना सोलापूर रोडवरील चौकातील आर्मर्ड कोर्रपस् सेंटर अँड स्कूलच्या (एसएससी अँड एस ) रणगाड्याची प्रतिमा भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.
आमदार जगताप म्हणाले, नवीन पिढीला आपल्या शहराचा इतिहास माहिती असला पाहिजे. या दृष्टीने देखील काम होण्याची गरज आहे.  
स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे म्हणाले, 531 वर्षांचा कालखंडाचा इतिहास हा या शहराची ओळख आहे. हा ऐतिहासिक वारसा जतन व संवर्धनासाठी जागृक नागरिकांचे योगदान महत्त्वाचे आहे. शहराने आलेल्या कोरोना संकटाला मोठ्या धैर्याने लढा दिला आहे. शहराच्या कर्तबगारी व शौर्याची इतिहासात नोंद आहे. कोरोनाशी लढा देत हे संकट देखील परतवून लावण्यासाठी नगरकर सज्ज आहेत.

No comments:

Post a Comment