लाभांश अदा करताना सभासदांना व्याजासह लाभांशाची रक्कम अदा करावी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, May 21, 2021

लाभांश अदा करताना सभासदांना व्याजासह लाभांशाची रक्कम अदा करावी

 लाभांश अदा करताना सभासदांना व्याजासह लाभांशाची रक्कम अदा करावी

नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः जिल्हा सहकारी बँकेतर्फे सभासदांना सन 2019- 20 वर्षाच्या लाभांश वाटपासाठी रिझर्व्ह बँकेची परवानगी मिळेपर्यंत ही रक्कम स्वतंत्र बँक खात्यावर वर्ग करावी, म्हणजे या रकमेवर व्याज सुरू होईल.लाभांश वाटप प्रसंगी खात्यावरील व्याजासह सभासदांना रक्कम अदा करावी,अशी मागणी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी पत्राद्वारे बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांच्याकडे केली आहे .
श्री तनपुरे म्हणाले,जिल्हा बँकेला प्रत्येक वर्षी नफा होतो. जिल्ह्यातील विविध सहकारी संस्था बँकेच्या सभासद आहेत.बँकेच्या भागभांडवलामध्ये त्यांची मोठी गुंतवणूक आहे.बँक सातत्याने या सभासद संस्थांना लाभांशाचे वाटप करते. मात्र,सन 201 9 -20 या आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेच्या परवानगीअभावी अद्याप लाभांशाचे वाटप होऊ शकले नाही.त्यामुळे बँकेच्या सभासद संस्थांना त्यांच्या गुंतवणुकीवरील परतावा अद्याप प्राप्त झालेला नाही. यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.बँकेला देय असलेली लाभांशाची रक्कम एका स्वतंत्र खात्यावर वर्ग केली तर त्यावर व्याज मिळू शकेल.त्याचा लाभ सभासद संस्थांना देता येईल. अशा पद्धतीने रिझर्व्ह बँकेची परवानगी मिळाल्यावर लाभांश अदा करताना सभासदांना व्याजासह लाभांशाची रक्कम अदा करावी.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here