मनसेच्यावतीने पोलीस स्टेशन व ट्राफिक पोलीस यांना फेस शिल्डचे वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, May 21, 2021

मनसेच्यावतीने पोलीस स्टेशन व ट्राफिक पोलीस यांना फेस शिल्डचे वाटप

 मनसेच्यावतीने पोलीस स्टेशन व ट्राफिक पोलीस यांना फेस शिल्डचे वाटप


नगरी दवंडी/प्रतिनिधी
शिर्डी ः आज मनसेच्यावतीने पोलीस स्टेशन व ट्राफिक पोलीस यांना फेस शिल्डचे वाटप करण्यात आले. दिवसेंदिवस कोरोना चा धोका वाढतच चालला आहे. त्यामुळे रात्रंदिवस नागरिकांच्या आरोग्यासाठी झटणारे डॉक्टर, आरोग्य व पोलीस कर्मचारी यांचा जवळुन संपर्क येत आहे. त्यांच्याही आरोग्याची काळजी आपण का घेऊ नये या हेतूने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिर्डी पोलिस स्टेशन व शिर्डी ट्राफिक पोलिस कर्मचारी यांना फेस शिल्ट चे वाटप करण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी आज शिर्डी पोलिस स्टेशन मधील सर्व पोलिस बांधवांना फेस शिल्ट वाटप करुन उपक्रम राबविला आहे. पोलिस बांधव हे पुर्णपणे फिल्डवर कार्यरत असतात गर्दीशी त्यांचा संपर्क आधिक येतो अशावेळी त्यांनी काळजी घेणे जास्त गरजेचे असते. म्हणूनच फेस शिल्डचा पावर करन संसर्गाचा धोका कमी करता येतो हेलक्षात घेवुन आज मनसचे अध्यक्ष सौरभ हाडवळे यांच्यावतीने पोलिस स्टेशन कर्मचारी यांना फेस शिल्ड वाटप केले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here