मनपा हद्दीतील ‘भाजीपाला व फळ विक्रीवरील बंदी’ उठवावी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, May 20, 2021

मनपा हद्दीतील ‘भाजीपाला व फळ विक्रीवरील बंदी’ उठवावी

 मनपा हद्दीतील ‘भाजीपाला व फळ विक्रीवरील बंदी’ उठवावी

त्वरीत निर्णय न घेतल्यास लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मनपा हद्दीतील ‘भाजीपाला विक्री बंदी’ उठवुन मार्केटयार्ड मधील फळे व भाजीपाला विक्री ‘संयुक्तपणे गर्दीचे नियमन’ करत सुरू करावी व शहर हद्दीतील लहान मुले, गरोदर महिला, आजारी नागरिक यांच्या सकस आहार खाण्याच्या मानवी हक्कावर गदा आणू नये. याबाबत त्वरीत निर्णय न घेतल्यास आपल्या निवासस्थानी लाक्षणिक उपोषण करण्यात येईल. असा इशारा कॉम्रेड भैरवनाथ वाकळे यांनी मनपा आयुक्तांना दिला आहे.
वाकळे यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हअले आहे की, आपण दि.2 मे पासुन सलग 15 मे पर्यंत शेतमाल भाजीपाला विक्री बंदी लागु केलेली आहे. हि बंदी शेतकरी व शहरातील लहानमुले, गरोदर महिला व आजारी नागरिक यांच्यावर अन्यायकारक आहे. आम्ही आपणास वेळोवेळी इमेल व दूरध्वनीद्वारे याबाबत कळविले आहे. आपणास या गंभीर प्रश्नावर मनपाने शेतमाल भाजीपाला खरेदीकेंद्र सुरू करत मनपा हद्दीतील नागरिकांना पुरविण्याचा उपाय करण्याचेही सुचविले होते परंतु आपण दुर्लक्ष करत आहात. आपण कृषी विभागाच्या ’आत्मा’ या संस्थेसोबत बोलतो आहोत, असे खोटेच सांगितलेले दिसून येत आहे. आपण एकच दिवस अंशत: बंदी उठवत पुन्हा दि.16 मे पासुन ती सुधारीत आदेश काढत 01 जुन पर्यंत वाढवली आहे.
आपल्या जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचा आकडा मोठा आहे, हे आपण जाणत असाल. आपण दि.16 रोजी काढलेल्या आदेशात मोठी तफावत आहे. परिशिष्ट - अ मधील सुरू ठेवायच्या गोष्टींमधे दुकानदारांना बि-बियाणे, खते विक्रीस परवानगी दिलेली आहे तर  परिशिष्ट - ब मधील विक्रीस बंदी घातलेल्या गोष्टींमधे शेतकरी मोठया कष्टाने कर्जभानगडी करून पिकवत असलेल्या शेतमाल भाजीपाल्यास संपुर्ण विक्री बंदी घातलेली आहे. या तफावतीमुळे या आदेशाचा अर्थ आहे कि, शेतक-यांनी दुकानदाराकडून बि-बियाणे, खते विकत घ्यायची पण आपला भाजीपाला विक्री करायची नाही. हि गोष्ट अत्यंत अन्यायकारक आहे, शेतकरी व जनविरोधी आहे. आपण मनपा हद्दीत फेरफटका मारला तर असे लक्षात येईल कि आपल्या या निर्णयामुळे शहरात ‘वॉईन शॉप सुरू आहेत पण शेतकर्‍यांना भाजीपाला विक्रीस बंदी’ आपल्या या निर्णयामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या वाढण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच शहरातील लहान बालके, गरोदर महिला व आजारी नागरिक यांना भाजीपाला, अंडी हा सकस आहार मिळाला तरच त्यांची कोरोनाविरूध्द लढण्याची इम्युनिटी पॉवर वाढणार आहे. आपल्या या शेतमाल भाजीपाला विक्री बंदीमुळे मुले, महिला व आजारी नागरिकांच्या सकस आहार खाण्याच्या मानवी हक्कावर गदा येत आहे. हे आपण लक्षात घेतले पाहिजे.आम्ही आपणास आज पुन्हा या पत्राद्वारे विनंती करत आहोत कि,मनपा हद्दीतील शेतमाल ‘भाजीपाला विक्री बंदी’ उठवुन मार्केटयार्ड मधील फळे व भाजीपाला विक्री ’संयुक्तपणे गर्दीचे नियमन’ करत सुरू करावी व शहर हद्दीतील लहान मुले, गरोदर महिला, आजारी नागरिक यांच्या सकस आहार खाण्याच्या मानवी हक्कावर गदा आणू नये. त्यांना तो मिळाला पाहिजे म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेने पुढाकार घ्यावा.
त्यासाठी आपण त्वरीत किसान सभा प्रतिनिधी, कृषीमाल उत्पादक, मार्केटयार्ड मधील कृषीमाल फळे व भाजीपाला विक्रेते संघटनेचे प्रतिनिधी, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रतिनिधी, सहकार निबंधक कार्यालय प्रतिनिधी, कृषी विभाग (आत्मा) प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेऊन शेतकर्‍यांचा शेतमाल भाजीपाला व फळे मनपा हद्दीतील नागरिकांना कसा पुरवता येईल हे लवकरात लवकर ठरवावे. त्यासाठी सर्वांनी संयुक्त प्रयत्न करायचे आहेत. फक्त भाजीपाला विक्री बंदी करून चालणार नाही शेतमाल विक्रीसाठी व नागरिकांना सकस आहार मिळण्यासाठी आपण सर्वांनी संयुक्त पर्याय निर्माण केला पाहिजे. शेतकरी, लहानमुले, गरोदर महिला व आजारी नागरिक यांचा प्रश्न सोडविण्याकडे गांभिर्याने पहाणार नसाल, प्रश्न सोडविणार नसाल तर आम्ही आपल्या निवासस्थानी शनिवार दि.22 मे 2021 रोजी सकाळी 11 वाजलेपासुन लाक्षणिक उपोषण सुरू करू. याची नोंद घ्यावी.

No comments:

Post a Comment